Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season: सिंधुदुर्गच्या पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम लांबणार

Climate Change Impact: सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात यंदा आंबा हंगाम अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. हवामानातील अनियमित बदल आणि तापमानातील चढ-उतार याचा फळधारणेवर परिणाम झाला आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात आंबा कलमांना आता मोहर फुटू लागल्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम लांबणार हे स्पष्ट झाले आहे. २० मे नंतरच या भागात आंबा हंगाम सुरू होण्याचा अंदाज आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नोव्हेंबर, डिसेंबरपासून ते जानेवारीपर्यंत आंबा कलमांना मोहर येणे सुरू होते. त्यामुळे या भागातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा पुढील पंधरा ते वीस दिवसांत परिपक्व होण्यास सुरुवात होईल.

परंतु पूर्वपट्ट्यात २० फेब्रुवारीनंतर आंबा कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. तापमानवाढीत मोहर मोठ्या प्रमाणात करपत आहे. परंतु मोहर टिकला तरी त्यापासून उत्पादन कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोहर आल्यानंतर साधारणपणे ९० ते १०० दिवसांचा कालावधी आंबा परिपक्व होण्यासाठी लागतो. त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम २० मे नंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.

हंगाम अडचणीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे १५ मे नंतर मॉन्सूनपूर्व पाऊस, वादळी-वारे वाहण्याचा अंदाज असतो. या पावसाचा जोर पूर्वपट्ट्यात अधिक असतो. त्यामुळे या वर्षी देखील अशाच पद्धतीने पाऊस झाला तर पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम अडचणीत येण्याची अधिक शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार, जाणून घ्या कधी मिळेल 'पीएम किसान'चा २१ हप्ता?

Water Conservation : जलयुक्त शिवार आराखड्यात २६८८ कामे प्रस्तावित

local Body Elections: नगर परिषद निवडणुकीत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा

Sugarcane Management: पूरबाधित उसाचे व्यवस्थापन तंत्र

MSP Procurement: नांदेड जिल्ह्यात ३३ शासकीय खरेदी केंद्रांना मान्यता

SCROLL FOR NEXT