Mango Festival Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Mango Festival : कृषी पणन मंडळाच्या वतीने रविवार पासून (ता.१९) येथे 'कोल्हापूर आंबा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Mango Festival : कृषी पणन मंडळाच्या वतीने रविवार पासून (ता.१९) येथे 'कोल्हापूर आंबा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटी हॉल मध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंत हा महोत्सव होईल. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी ही माहिती दिली. २३ मे अखेर हा महोत्सव होणार आहे.

रविवारी सकाळी अकरा वाजता विशेष महापोलिस निरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्थेचे अरुण काकडे,जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, नाबार्डचे महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, उमेश घुले, गणेश गोडसे आदींच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होईल.

आंबा महोत्सव मध्ये ग्राहकांना आंब्याच्या  विविध  जाती  माहीत होण्यासाठी  राज्यातील आंब्याचे  प्रदर्शनही होणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी पणन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजना अंतर्गत विविध फल महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा  या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केसर व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये आंबा उत्पादक याना 30 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडुन आंबा उपलब्ध होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार

Rabi Intercropping: रब्बीत कोरडवाहू क्षेत्रात आंतरपिकाचे पर्याय कोणते? अधिक उत्पादनासाठी आंतरपीक गरजेचे

Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको

SCROLL FOR NEXT