Mango Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Agricultural Marketing Board : कृषी पणन मंडळाच्या वतीने रविवारपासून (ता. १९) येथे ‘कोल्हापूर आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कृषी पणन मंडळाच्या वतीने रविवारपासून (ता. १९) येथे ‘कोल्हापूर आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. राजारामपुरी येथील भारत हौसिंग सोसायटी हॉलमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होईल. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी ही माहिती दिली. हा महोत्सव गुरुवारपर्यंत (ता. २३) सुरू राहणार आहे.

रविवारी सकाळी अकरा वाजता विशेष महापोलिस निरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्थेचे अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, ‘नाबार्ड’चे महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, उमेश घुले, गणेश गोडसे आदींच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‍घाटन होईल.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी, केसर व इतर विविध जातींचे आंबा उत्पादक शेतकरी महोत्सवात सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती माहीत होण्यासाठी राज्यातील आंब्यांचे  प्रदर्शनही होणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी पणन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आटपाडी, जि. सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शनिवारपासून (ता. १८) चार दिवस ‘आंबा महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवात थेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा ग्राहकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचा आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले आहे.

शेतकरीहित डोळ्यांसमोर ठेवून आटपाडी बाजार समिती सातत्याने विविध उपक्रम राबवते. बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळिंब, सीताफळ, आंबा, चिकू या फळांचे लिलाव सुरू केलेत. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. कोकणातून व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा आंबा आणून गावोगावी ग्राहकांना विक्री केला जातो.

आंबा लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे. बाजार समितीने आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून यंदा शनिवारपासून (ता. १८) ते मंगळवारपर्यंत (ता. २१) चार दिवस ‘आंबा महोत्सव’ भरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव या तालुक्यांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लांजा, पावस, गुहागर, संगमेश्वर या भागातील शेतकरी स्वतःच्या शेतातील आंबा घेऊन सहभागी होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT