Mango Farming : सातत्यपूर्ण प्रयोगांमधून वाढविला आंब्याचा दर्जा

Success Story of Farmer : मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील विद्याधर पुसाळकर यांनी समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या आंबा बागेत विविध प्रयोग करण्यात सातत्य राखले आहे. त्यांनी फळांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon

शेतकरी : विद्याधर पुसाळकर

Mango Quality Experiments : मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील विद्याधर पुसाळकर यांनी समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या आंबा बागेत विविध प्रयोग करण्यात सातत्य राखले आहे. त्यांनी फळांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे. कलमांचे पुनरुज्जीवन, सतत येणाऱ्या मोहोरावर नियंत्रण ठेवणे, कीड-रोग व्यवस्थापन, सेंद्रीय खतांच्या वापरावर भर अशी व्यवस्थापन पद्धती अवलंबली आहे.

आंबा विक्रीसाठी मुंबई, पुण्याच्या दलालांवर अवलंबून न राहता राज्यासह अन्य राज्यांमध्ये स्वतः वितरकांची साखळी निर्माण केली आहे. त्यातून विक्री व्यवस्था मजबूत बनली आहे. यंदा पाऊस कमी झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात सतत ढगाळ वातावरण आहे.

या निसर्गातील बदलांवर मात करण्यासाठी बागेवर लक्षकेंद्रित करत, फेब्रुवारीच्या अखेरीस उत्पादन घेण्यावर त्यांनी यंदा भर दिला आहे. मागील हंगाम संपुष्टात आल्यानंतर जून २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यापासून आंबा बागायतींची काळजी घेण्यास सुरवात केली आहे.

Mango Orchard
Crop Damage : पुसद तालुक्यात ३० हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित

जून ते नोव्हेंबर पर्यंतचे कामकाज

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रत्नागिरीत मोसमी पावसाला सुरुवात झाली. पहिला पाऊस पडल्यानंतर १० वर्षांवरील कलमांना १५ ते २० घमेली शेणखत आणि गांडूळखत मात्रा दिली. त्याशिवाय ५ ते ७ किलो निमपेंड, करंजपेंड देखील देण्यात आली.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात रासायनिक खतांच्या मात्रा देण्यात आल्या. गतवर्षी ज्या कलमांपासून उत्पादन घेतले नाही अशा कलमांना ४ किलो प्रति कलम आणि उत्पादन घेतल्या कलमांना २ किलो याप्रमाणे खत मात्रा देण्यात आली. पुढील वर्षी उत्पादन घेण्याचे नियोजन असलेल्या कलमांना १०ः२६ः२६ आणि उत्पादन न मिळणाऱ्या कलमांना १९ः१९ः१९ ही खते दिली आहेत.

रासायनिक खतांच्या मात्रा दिल्यानंतर २० जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत पावसाचा अंदाज घेऊन संजीवकांचा डोस दिला आहे. झाडांच्या वयानुसार त्याचे प्रमाण निश्‍चित केले जाते. कलमांना उभारणी मिळण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दोन वेळा प्रति कलम १० ते १५ लिटर जीवामृत देण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बागेतील साफसफाईच्या कामांना सुरुवात केली. बागेत वाढलेले गवत आणि कलमांवर चढलेल्या रानवेलींची काढून घेण्यात आल्या. काढलेले गवत आणि रानवेली कलमांच्या बुध्यांमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा ग्रासकटरने गवत कापणी केली.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के कलमांना पालवी दिसून येत होती. उर्वरित १५ टक्के कलमांवर मोहोर येण्याच्या स्थितीत होता. त्यावर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली आहे.

या महिन्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. तसेच हलका पाऊस पडल्यामुळे कलमांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी सुरु आहे.

Mango Orchard
Hailstrom : नुकसानकारक गारपिटीचा व्हावा विचार

आगामी नियोजन

पालवी फुटलेल्या कलमांवर रासायनिक फवारणी घेतलेली नाही. त्या कलमांना डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संजीवकांच्या मात्रा देण्यात येतील. सध्या ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी कलमांचे निरिक्षण केले जाईल.

जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत लहान कैऱ्या लागण्यास सुरुवात होईल. कलमांची हलवणी करून आलेला मोहोर खाली पाडला जाईल. कलमांना आठवड्याला १०० लिटर प्रमाणे सिंचनाद्वारे जीवामृत किंवा रासायनिक खतांचा डोस दिले जातील.

काही कलमांना डिसेंबरमध्ये कैरी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी कलमांना खत आणि सिंचनाचे योग्य नियोजन केले जाईल.

काढणी, विक्री नियोजन

आंबा काढणी करताना दुपारी १२.३० ते २ या उन्हाच्या कालावधीत काढणी करणे टाळले जाते. आंबा देठासह काढून सावलीत आणून ठेवला जातो. साधारण १६ आणे (७५ टक्के तयार झालेला) फळे काढण्यावर भर दिला जातो.

आंबा काढणीनंतर प्रतवारी करून १५० ते ३३० ग्रॅमपर्यंत फळे बाजूला काढली जातात. विक्री एक, दोन डझन पुठ्ठ्याच्या बॉक्समधून केली जाते.

सुरवातीला मिळणारे आंबा उत्पादन हे मुंबई येथील वाशी आणि पुणे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. १५ मार्चनंतर वैयक्तिक पातळीवर विक्रीला प्राधान्य दिले जाते.

- विद्याधर पुसाळकर, ९८८१३०७२९४

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com