Mango and Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत

Mango Cashew Growers : नियमित आंबा हंगाम अवघ्या चार-पाच दिवसांवर आला असताना जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : नियमित आंबा हंगाम अवघ्या चार-पाच दिवसांवर आला असताना जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळपासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण असून वारा देखील आहे. त्यामुळे पावसाच्या शक्यतेने बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. सायकांळी पावसाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. परंतु शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पावसाच्या वातावरणाबरोबरच वारेदेखील होते.

त्यामुळे पाऊस पडण्याच्या शक्यतेने आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात नियमित हापूस हंगाम सुरू झालेला नाही. पुढील चार-पाच दिवसांत नियमित हंगाम सुरू होण्याची अंदाज आहे.

असे असतानाच वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. दुसरीकडे काजू हंगाम सध्या सुरू आहे. विलंबाने हंगाम सुरू झाल्यामुळे या हंगामावर देखील या वातावरणाचा परिणाम होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेची तीव्रतादेखील अधिक जाणवत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT