Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : आंबा, काजू बागायतदारांचे कर्जमाफीसाठीचे आंदोलन मागे

Mango Cashew Farmer : गेल्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर आंबा, काजू बागायतदारांचे हे साखळी आंदोलन सुरू होते.

Team Agrowon

Ratnagiri News : आंबा, काजू बागायतदरांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाकडे स्थानिक प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. अखेर माजी आमदार बाळ माने, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय बने, माजी सभापती परशुराम कदम यांनी पुढाकर घेत मंत्र्यांच्या माध्यमातून मागण्या मान्य करून घेऊ, अशी हमी दिली.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या माध्यमातून आंबा, काजू बागायतदारांचा प्रश्न सोमवारी (ता. १८) विधानसभेत आवाज उठवला जाईल, तुम्ही आंदोलन मागे घ्या, असे आवाहन केल्यानंतर आंदोलकांचे नेते बावा साळवी यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

उपोषणकर्ते शेतकरी रामचंद्र मोहिते यांना बाळ माने, उदय बने यांनी सरबत देऊन उपोषण थांबविले. गेल्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर आंबा, काजू बागायतदारांचे हे साखळी आंदोलन सुरू होते. करबुडे येथील आंबा बागायतदार शेतकरी रामचंद्र मोहिते यांनी उपोषण पुकारले होते.

इतर बागायतदारांनी त्याला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. गेल्या आठवडाभरानंतरही आपल्या मागणीवर काहीही ठोस निर्णय वा लोकप्रतिनिधिंनीही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलक बागायतदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

या आंदोलकांची बाजू शासनदरबारी मांडावी यासाठी माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्या वेळी बागायतदार संघटनेचे बावा साळवी, टी. एस. घवाळी, परशुराम कदम, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT