Mango, Cashew  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Forecast : आंबा, काजू, भात उत्पादक पावसाच्या शक्यतेने धास्तावले

Cloudy Weather : २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह भातपीक उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्यामुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह भातपीक उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. या संभाव्य पावसामुळे अंतिम टप्प्यातील भातपीक कापणीवर देखील परिणाम होणार आहे.

जिल्ह्यातील भातपीक कापणी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये आंब्याला पालवी, मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्याच्या उर्वरित भागात काजू पिकाला देखील पालवी येऊ लागली आहे. तर काही भागांत मोहोरदेखील येऊ लागला आहे.

अशा परिस्थितीत आता जिल्ह्यावर पुन्हा एकदा पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने २४ ते २६ नोव्हेंबर या तीन दिवसांत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे. या पावसाचा मोठा परिणाम अंतिम टप्प्यात असलेल्या भातपीक कापणीवर होणार आहे.

लांबलेली भातपीक कापणी पावसामुळे पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता आहे. आंबा, काजू या फळपिकांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंबा, काजूवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. पालवी आलेल्या झाडांवर टी मॉस्कीटोचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

जिल्ह्यातील बहुतांश आंबा, काजू बागायतदारांनी गेल्या काही दिवसांपासून बागांमधून मशागतीची कामे सुरू केली आहेत. काही शेतकऱ्यांची कीटकनाशकांची फवारणीदेखील झाली आहे. त्यामुळे पाऊस पडला किंवा ढगाळ वातावरण निर्माण झाले तर पुन्हा फवारणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू पालवी आणि मोहोर स्थितीत आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा, काजूवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप पाहून विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची स्टीकर वापरून फवारणी करावी. जेणेकरून आंबा, काजूचे नुकसान टाळता येईल.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिकी अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT