Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मंडळांनी ओलांडली पावसाची सरासरी

Nashik Rain : विभागातील सहा तालुक्यांमध्ये ५० पैकी ३९ तहसील मंडळांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Nashik News: मालेगावसह कसमादे तसेच चांदवड, नांदगाव या तालुक्यांवर वरुणराजा या वर्षी चांगलाच मेहरबान आहे. विभागातील सर्व सहा तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. विभागातील सहा तालुक्यांमध्ये ५० पैकी ३९ तहसील मंडळांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

चांदवड तालुक्यातील धोडांबे मंडलात सर्वाधिक २६९ टक्के, मालेगाव तालुक्यातील कळवाडी मंडळात १७२ टक्के, बागलाण मुल्हेर मंडलात १९० टक्के, कळवण दळवट मंडळात १८० टक्के, नांदगाव मधील न्यायडोंगरी मंडलात १६० टक्के पाऊस झाला आहे.

मालेगाव तालुक्यातील पर्जन्यमान ४५७.७ मिलिमीटर एवढे आहे. तालुक्यात सर्वाधिक १३ मंडल आहेत. यात दाभाडी, कुकाणे, अजंग व जळगाव निं. या चार मंडळांमध्ये थोडा कमी पाऊस झाला. उर्वरित मालेगाव, वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, कळवाडी, सौंदाणे, सायने, डोंगराळे, निमगाव या मंडलांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे.

बागलाण तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान ४८८.२ मिलिमीटर आहे. तालुक्यातील बागलाण, ब्राह्मणगाव, नामपूर, जायखेडा, वीरगाव, डांगसौंदाणे, मुल्हेर, ताहराबाद, मुंजवाड व किकवारी या दहा मंडळांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे.

केवळ खालचे टेंभे या एकमेव मंडलात कमी पाऊस आहे. कळवण तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३९.६ मिलिमीटर एवढे आहे. तालुक्यातील सहापैकी कळवण, नवीबेज मोकभणगी, दळवट या मंडळांनी सरासरी ओलांडली आहे.

कनाशी व अभोणा ही दोन्ही मंडळे सरासरीच्या उंबरठ्यावर आहेत. नांदगाव तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४९१.४ आहे. तालुक्यातील ८ पैकी नांदगाव, मनमाड, वेहेलगाव, जातेगाव, हिसवाळ, बाणगाव, न्यायडोंगरी या मंडळांनी सरासरी ओलांडली असून भार्डी मंडलात कमी पाऊस आहे.

चांदवडचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५२९.५ मिमी आहे. तालुक्यात ८ मंडले असून यातील चांदवड, दिगवद, वडनेर भैरव, वडाळी, धोडंबे या मंडलांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर रायपूर, दुगाव व शिंगवे या मंडलांत कमी पाऊस आहे.

देवळाचे सरासरी पर्जन्यमान ४२२.७ मिलिमीटर आहे. तालुक्यात ४ मंडल आहेत. देवळा, लोहणेर, उमराणे व खर्डे या चारही मंडळांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT