Manchar APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Manchar Onion Market : मंचरला जुन्या कांद्याला मिळाला प्रतिकिलोला ७० रुपये उच्चांकी दर

Manchar Onion Prices : मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. ७) विक्रीसाठी आलेल्या जुन्या कांद्याला प्रतीकिलोला ७० रुपये दर मिळाला.

Team Agrowon

Manchar News : मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. ७) विक्रीसाठी आलेल्या जुन्या कांद्याला प्रतीकिलोला ७० रुपये दर मिळाला. गेल्या दोन वर्षातील हा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी व अडत्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.

बाजारात तीन हजार ४६५ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रामुख्याने लाखणगाव, नारोडी, निरगुडसर, शिंगवे-पारगाव, देवगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांनी टेम्पो व ट्रॅक्टर-ट्रॉलीतून कांदा पिशव्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

बंेगलुरू, हैदराबाद, सुरत व मुंबई भागांतील व्यापारी कांदा खरेदीसाठी येथे आले होते. विजय नामदेव सैद (रा. गिरवली), यशवंत शंकर हिंगे (रा. अवसरी बु.), मच्छिंद्र कोंडीभाऊ वळसे पाटील (रा. निरगुडसर) यांच्या जुन्या कांद्याला प्रती दहा किलोला ७०० रुपये बाजारभाव मिळाल्याचे अडतदार श्याम महादेव टाव्हरे, सुभाष गणपत निघोट यांनी जाहीर केले.

नव्या कांद्याला प्रती किलोला ५५ रुपये बाजारभाव मिळाला. नवीन कांदा ५०० पिशव्यांची बाजार आवारात आवक झाली.

कांद्याचे प्रती दहा किलो बाजारभाव पुढीलप्रमाणे : सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा- ६५० ते ७००, सुपर गोळे कांदा १ नंबर- ६३० ते ६५०, सुपर मीडियम २ नंबर कांदा- ५५० ते ६३०, गोल्टी कांदा- ३५० ते ४५०, बदला कांदा २५० ते ४०० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

Maharashtra Agricultural Council: कृषी परिषदेला मिळेना पूर्णवेळ संचालक

SCROLL FOR NEXT