Thane News : जिल्हा परिषदेने गतिमान आणि पारदर्शक कारभाराकडे लक्ष केंद्रित करताना कुपोषणावर मात करण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत, मात्र या योजनांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे.
सध्याच्या घडीला पाच तालुक्यांत ९२ तीव्र आणि एक हजार १२३ मध्यम कुपोषित बालके असून, शहापूर तालुक्यात सर्वाधिक ४५ बालकांची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा आदिवासीबहुल आहे. या भागांत आजही जुन्या अनिष्ट रूढी, परंपरांचा पगडा आहे. रोजगार नसल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागते.
त्यामुळे अनेकदा नवजात बालकांसह लहान मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे, तर काही पारंपरिक पद्धतीमुळे सुरुवातीच्या कालावधीतच बालकांच्या वाढ होण्यावर मर्यादा येतात.
जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग कार्यरत असतात, पण ग्रामीण भागात बालकांचे कुपोषण कमी करण्यात जिल्हा परिषदेला अपेक्षित यश मिळालेले नाही. जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या कमी असली तरी मध्यम कुपोषित बालकांची संख्या हजारांच्यावर आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
तालुका तीव्र मध्यम
शहापूर ४५ ५१८
मुरबाड ९ १७३
भिवंडी २९ २९५
अंबरनाथ ४ ४६
कल्याण ५ ९१
एकूण ९२ १,१२३
दोन वर्षांची नोंद
२०२४ तीव्र मध्यम
जुलै १०० १,०८४
ऑगस्ट १०० १,०८५
सप्टेंबर ८८ १.०२३
ऑक्टोबर ७६ १.००९
नोव्हेंबर ६६ ९६१
२०२५ तीव्र मध्यम
जानेवारी ८१ १,१४७
फेब्रुवारी ८३ १,०९९
मार्च ९२ १,१२३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.