Malegaon Horse Market Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Horse Market : देशात पहिल्या पाच बाजारांपैकी एक माळेगावचा घोडेबाजार

Horse Market : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा अनेक वैशिष्ट्य आहेत. यापैकी एक म्हणजे इथला घोडेबाजार देशपातळीवर ख्यातकीर्त आहे. देशभरातील घोडे व्यापारी व अश्‍वशौकीन पशुपालकांची घोडे खरेदीसाठी माळेगावला पसंती असते.

Team Agrowon

Nanded News : नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा अनेक वैशिष्ट्य आहेत. यापैकी एक म्हणजे इथला घोडेबाजार देशपातळीवर ख्यातकीर्त आहे. देशभरातील घोडे व्यापारी व अश्‍वशौकीन पशुपालकांची घोडे खरेदीसाठी माळेगावला पसंती असते. बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या भागांतून व्यापारी माळेगाव यात्रेत घोडे विक्री व खरेदीसाठी येतात. माळेगाव यात्रेत वीस दिवसांपर्यंत घोडेबाजार चालतो. या बाजारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते.

महाराष्ट्रात सारंगखेडा (नंदुरबार), अकलूज (सोलापूर), माळेगाव (नांदेड) हे प्रमुख घोडेबाजार आहेत. माळेगाव तेथे साडेतीनशे वर्षांपासून दरवर्षी भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. निजाम काळात निजाम येथूनच घोडे खरेदी करायचे. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत कोटींची उलाढाल करणारा मराठवाड्यातील माळेगावचा हा घोडेबाजार आहे. हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. देशात पुष्कर, बलोतरा, नागौर (राजस्थान), सोनपूर (बिहार), बाराबंकी (उत्तर प्रदेश) ही प्रमुख घोडेबाजार आहेत.

या यादीत पहिल्या पाच घोडे बाजारात माळेगावची गणती होते. माळेगावात दाखल झालेले व्यापाऱ्यांच्या मतानुसार माळेगाव यात्रेत घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत. उत्तर प्रदेश व राजस्थानातून चार-पाच पिढ्यांपासून व्यापारी माळेगावात येतात. आधी राजस्थानातील पुष्कर, मग पंढरपूर, तिथून सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो माळेगावला. आणि तिथून पुन्हा अकलूज हा बाजार जातो. बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे घोडे विक्रीसाठी येतात.

या बाजारात त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून ५० लाखांपर्यंत घोड्यांच्या किमती असतात. मारवाडी जातीचे घोड्यांची उंची साडेपाच ते साडेपाच फूट असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून, त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी उंच असतात. या घोड्यांना विशेष मागणी असते.

अशा ठरतात घोड्यांच्या किमती

घोड्यांच्या अंगातील जन्मजात असलेले रूप, स्वभाव, शुभ गुण आणि खुणा यावर घोड्यांच्या किमती असल्या तरी त्याची चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा याचीही पाहणी खरेदीदार करून त्याची किंमत ठरावीत असतात. घोड्यांचे नखरे हे त्याच्या सौंदर्याचे प्रतीक असते आणि या बाजारात अशाच अनेक घोड्यांचे नखरे अश्‍व शौकिनांना आकर्षित करत असतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhekale Land Dispute: ढेकाळेतील उपकेंद्राच्या जमिनीवरून नवा पेच

Nanded Farmer Crisis: खरीपापूर्वीच शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर

Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्हा १२ तास अंधारात

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

Farmer Loss: मदनसुरी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT