Wild Animal Rampage  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Rampage : वन्यप्राण्यांकडून नुकसानीबाबत सकारात्मक निर्णय घ्या

वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून होणाऱ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शासनाने गठित केलेली राज्य समिती जिल्ह्यात दाखल झाली.

Team Agrowon

Sindhudurag Crop Damage : जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून (Wild Animal Rampage ) फळपिकांसह भातपीक, नाचणी (Ragi) आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) संदर्भात सकारात्मक निर्णय घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य समितीकडे केली.

वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून होणाऱ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शासनाने गठित केलेली राज्य समिती जिल्ह्यात दाखल झाली.

प्रधानसचिव आणि चार आमदारांच्या समितीतील मुख्य वनंरक्षक आर. एम. रामानुजन, दापोली विद्यापीठाचे डॉ. योगेश परूळेकर, डॉ. प्रकाश क्षीरसागर, डॉ. विनायक पाटील, अमृत शिदे, मदन क्षीरसागर या सदस्यांनी जिल्ह्यातील माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शेती आणि बागायतीची पाहणी केली. या वेळी समितीने प्रगतिशील शेतकरी दादा बेळणेकर यांच्या शेतीनुकसानीची पाहणी केली.

या वेळी बेळणेकर यांनी जिल्ह्यात नारळ, काजू, आंबा, फणस, केळी, पेरू, बांबू, अननस, सुपारी, कोकम, सीताफळ, भात, नाचणी, कुळीथ, उडीद, वाल, चवळी, भुईमूग, ऊस, मका, सोयाबीन, ज्वारी, सूर्यफुल, पाम आदी पिके घेतात.

या पिकांचे रानडुक्कर, माकड, केडली, गवा, नीलगाई, मोर, साळींदर, शेकरू, गिधाड, कोल्हा या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसानभरपाईबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली.

या वेळी सदस्यांनी नुकसानीसंदर्भातील अहवाल शासनाला सादर करून अधिकाधिक सकारात्मक निर्णय होतील, अशी ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या ६ खासदारांची बैठकीला दांडी, आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु, बंडखोरांना राऊतांचा इशारा

Agrowon Podcast: कापूस स्थिर; हिरवी मिरची टिकून , लसणाला उठाव, बेदाणा आवक कमी तर टोमॅटोला मागणी

Paddy Seedlings: भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Krishna River Upasa: ‘कृष्णे’तून उपसा, रोखायला भरारी पथके

Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ

SCROLL FOR NEXT