Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Seed Fertilizer : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व कृषी निविष्ठा वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.

Team Agrowon

Solapur News : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व कृषी निविष्ठा वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे, खते वेळेमध्ये उपलब्ध होतील, याची कृषी विभागाने काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

खरीप २०२४ हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, कृषी विकास अधिकारी परमेश्‍वर वाघमोडे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, उपसंचालक (कृषी व्यवसाय) मदन मुकणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख लालासाहेब तांबडे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

श्री. आशीर्वाद म्हणाले, की स्वयंचलित हवामान केंद्रासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांनी तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यामध्ये खतांचा बफर स्टॉक वाढवावा.

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रलंबित ई-केवायसी व आधार सीडेडचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी दिले. जिल्ह्यातील चांगले काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, पॉलिहाउस यांना भेटी देणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Exports: पोल्ट्री निर्यातीत दुपटीने वाढ, भारतीय अंड्यांना जगभरातून मोठी मागणी, युएई ठरला सर्वात मोठा खरेदीदार

Green Fodder Crop: बरसीम आणि ओट या बहुवार्षिक चारा पिकांचे लागवड तंत्र

Agri Stack: अॅग्रीस्टॅक अंतर्गत ८४ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी बाकी 

Farmers Crisis: शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर दुहेरी संकट

Soybean Market: लातूरमध्ये सोयाबीनची आवक मंदावली 

SCROLL FOR NEXT