Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Sowing Update : धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण ५ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा ५ लाख ७४ हजार ९०० हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
Meeting of district level Pre-Kharif Season
Meeting of district level Pre-Kharif Season Agrowon

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण ५ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा ५ लाख ७४ हजार ९०० हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. पेरणी होणाऱ्या क्षेत्रापैकी जवळपास ४ लाख ४० हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, ४५ हजार ३०० हेक्टरवर उडीद, २० हजार १०० हेक्टरवर मूग, ५१ हजार २०० हेक्टरवर तुरीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

Meeting of district level Pre-Kharif Season
Summer Sowing : उन्हाळी पेरण्यांना टंचाईची झळ

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व व कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. जिल्हा परिषद, कृषी विभाग, महाबीज प्रतिनिधी, एमआयडीसी प्रतिनिधी, कृषी विक्रेते प्रतिनिधी, खतपुरवठादार कंपनी प्रतिनिधी बैठकीला प्रामुख्याने उपस्थिती होती.

माहितीनुसार, की जिल्ह्यात २०२३ मधील खरीप पेरणी ५ लाख ६० हजार हेक्टरवर झाली होती. त्यापैकी जवळपास ६९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ४ लाख ७८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. ही पेरणी लक्षात घेता येत्या खरीप हंगामात ४ लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून येत्या हंगामात वेळेवर पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन बरोबरच मूग व उडीद पिकाखालील क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती माने यांनी दिली.

Meeting of district level Pre-Kharif Season
Kharip Sowing: वरुणराजाची हजेरीनं पेरणीला आला वेग

९८ हजार ३०३ टन खताची मागणी

जिल्ह्यात गत तीन वर्षांचा खताचा वापर लक्षात घेता सरासरी ८५ हजार ७५२ टन प्रतिवर्षी वापर झाला. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाकडून येत्या खरीप हंगामासाठी ९८ हजार ०३ टन खताची मागणी कृषी आयुक्तालय स्तरावर केलेली आहे. मागणीत २५ हजार ९१ टन युरिया, २२ हजार ४५७ टन डीएपी, ३४६२ टन एम. ओ. पी., ३९ हजार ८७१ टन एनपीके तर ७४२२ टन एस. एस. पी. खताची मागणी करण्यात आली होती.

त्या मागणीच्या आधारावर ८५ हजार ८०० टन खत आवंटन कृषी आयुक्तालयात म्हणून मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी एप्रिलकरिता ५ हजार ७५ टन आवंटन मंजूर आहे. त्यामध्ये १६७२ टन युरिया, ९२० टन डीएपी, १४४ टन एम ओ पी, १७७५ टन एनपीके, ५६४ एस. एस. पी. चा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com