Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

Crop Update : सोयाबीन व कपाशी ही दोन पिकेच प्रमुख राहणार असून, सोयाबीनची लागवड सुमारे दोन लाख ३७,५०० हेक्टरपर्यंत राहण्याची तर कपाशीची एक लाख ३६ हजार हेक्टरपर्यंत होऊ शकते.
Soybean and Cotton
Soybean and CottonAgrowon

Akola News : आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. कृषी विभागाने हंगामात लागवड होणाऱ्या संभाव्य पिके व क्षेत्राचे नियोजन केले आहे. यावेळीही सोयाबीन व कपाशी ही दोन पिकेच प्रमुख राहणार असून, सोयाबीनची लागवड सुमारे दोन लाख ३७,५०० हेक्टरपर्यंत राहण्याची तर कपाशीची एक लाख ३६ हजार हेक्टरपर्यंत होऊ शकते. यासाठी बियाण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

खरीप हंगामात गेल्या काही वर्षात सोयाबीन हेच मुख्य पीक राहलेले आहे. या वर्षीसुद्धा त्यात काही बदलाची चिन्हे नाहीत. सोयाबीनचा दर वर्षभर दबावात असूनही दुसरा सक्षम पर्याय नसल्याने सोयाबीनची लागवडच होऊ शकते. या हंगामात किमान दोन लाख ३७,५०० हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड होईल.

Soybean and Cotton
Soybean Market : सोयाबीन दर स्थिरावला

यासाठी ६१,६८७ क्विंटल बियाण्याची गरज आहे. तशी मागणी करण्यात आलेली आहे. तर कपाशीचे क्षेत्र १ लाख ३६ हजार हेक्टरपर्यंत राहणार असून त्यासाठी ३३८७ क्विंटल म्हणजेच ६ लाख ७७ हजार पाकिटे लागू शकतील, तशी मागणी आयुक्‍तालयाकडे झालेली आहे. याशिवाय हंगामात तुरीचीही लागवड ६१ हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे. मूग ३०००, उडीद ३०००, ज्वारी २०००, मका २५०, बाजरा २५ तर तिळाची ५० हेक्टरवर लागवडीची शक्यता आहे. जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी लागवड क्षेत्र ४ लाख ४३ हजार हेक्टरपर्यंत आहे.

खरिपातील पिकांची लागवड ही प्रामुख्याने पावसाच्या भरवशावर आहे. गेल्या हंगामात असमतोल पावसाने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. अकोट, पातूर या दोन तालुक्यांत सरासरीच्या ६५ टक्केही पाऊस झाला नव्हता. शिवाय उशिराने पाऊस आला तर पिकांच्या लागवडीवर त्याचा थेट परिणाम होत असतो.

Soybean and Cotton
Cotton Cultivation : साडेचार लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा

उत्पादकतेत वाढ झाल्याचा दावा

असमतोल पाऊसमान होत असतानाही जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढलेली दाखवली जात आहे. यात प्रामुख्याने सोयाबीनची हेक्टरी उत्पादन हे १३७९ किलो झालेले आहे. उत्पादकतेत ही ३३.७ किलो वाढ दर्शविण्यात आली आहे.

कपाशीचेही उत्पादन ८५ किलो वाढ झालेली आहे. तुरीची उत्पादकता तर सर्वाधिक ३८२ किलो वाढलेली आहे. तुरीचे हेक्टरी उत्पादन ११७० किलो एवढे दाखवण्यात आले आहे. या हंगामात सोयाबीनची उत्पादकता १७७१ किलो, कपाशी ४६५, तूर १२८७ तर मूग ७२५ आणि उडदाची ७३५ किलो साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पीकनिहाय लागवड

पीक २०२३-२४ चा हंगाम यंदाची अपेक्षित लागवड

सोयाबीन २३३८४५ २३७५०० हेक्टर

कपाशी १३२२९९ १३६०००

तूर ५८८२० ६१०००

मूग १९७० ३०००

उडीद १७९५ ३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com