Khandesh Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : खानदेशातील प्रमुख नद्या कोरड्याठाक

Khandesh Water Issue : खानदेशात सिंचन प्रकल्पांची वानवा आहे. त्यात प्रकल्पांत जलसाठे ४३ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. प्रमुख नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे नदीकाठी काही दिवसांतच टंचाई तयार होईल, अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांची वानवा आहे. त्यात प्रकल्पांत जलसाठे ४३ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. प्रमुख नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे नदीकाठी काही दिवसांतच टंचाई तयार होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे नद्यांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे.

रब्बी पिके, भाजीपाला, फळबागांसाठी सिंचनाची लगबग सुरू आहे. मात्र भूगर्भातील जलसाठा घटत आहे. तापी, गिरणा, पांझरा नदीतून वाळू उपसा भरमसाट सुरू आहे. यामुळे नदीत पाणी मुरत नाही. ते वाहून जाते. नदीमधील मोठे डोह, वाळू उपशामुळे तयार झालेले मोठे खड्डे यात पाणी साचते.

त्याचा उपयोग नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होण्यासाठी होतो. पण नदीमधील पाणी आटले आहे. गिरणा नदीत तीनदा पाणी सोडले आहे. पण नदीत पाणी थांबत नाही. पुन्हा या नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

तापी, अनेर व पांझरा नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. याचाही फटका पिकांना बसण्याची स्थिती आहे. या महिन्यात पाणी न सोडल्यास टंचाई वाढेल व पुढे नुकसान होईल. नदीकाठी केळी, लिंबू, मोसंबी आदी बागा, भाजीपाला पिकेही आहेत.

तसेच सध्या कापूस लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. तसेच नद्यांवर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी, कूपनलिका आहेत. त्यांच्या पुनर्भरण होणे आवश्‍यक आहे. तापी नदीत आसोदा, साकेगाव, औद्योगिक वसाहतीच्या पाणी योजनांचे स्रोत आहेत. गिरणा नदीत देखील भडगाव, म्हसावद, एरंडोलातील पाणी योजनांचे स्रोत आहेत. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming: एकात्मिक दुग्धव्यवसायातून पशूसखी होताहेत सक्षम

Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा

Weekly Weather: राज्यात सौम्य थंडीची शक्यता

Farmer Loan Waiver: द्राक्ष उत्पादकांची संपूर्ण कर्जमाफी करा

Crop Insurance Issue: बटाट्याचे क्षेत्र वाढूनही पीकविम्यात समावेश नाही

SCROLL FOR NEXT