Drought Conditions : मराठवाड्यात १०४ गावे, २५ वाड्यांत पाणी टंचाई

Drought declared : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात १०४ गावे, २५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Drought Condition
Drought Conditionagrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यात हळूहळू टँकरची संख्या वाढत चालली आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात विशेष करून टंचाई जाणवत आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील १०४ गावे, २५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.


यंदा मराठवाड्यातील पाणीसाठ्याची अवस्था बिकट आहे. तीन-चार वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी पाणीसाठा आहे. पाऊसच कमी झाल्याने ना भूजल पातळी वाढली ना पाणीसाठ्यांमधील पाण्यात वाढ झाली. त्याचा थेट परिणाम आता जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यात १०४ गाव व २५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७८ गावे व ६ वाड्या तर जालना जिल्ह्यातील २६ गावे व १९ वाड्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर व पैठण तालुक्यात टंचाईची झळ सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड व कन्नड तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. जालना जिल्ह्यात बदनापूर भोकरदन त्या पाठोपाठ जालना व घनसांगी तालुक्यात टंचाई जाणवते आहे.

टंचाई निवारण्यासाठी १२४ टँकर छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी १२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील खासगी ८४ टँकरसह जालना जिल्ह्यातील दोन शासकीय व ३८ खासगी मिळून ४० टँकरचा समावेश आहे.

३७६ विहिरींचे अधिग्रहण

टँकर व टँकर व्यतिरिक्त आणि पुरवठ्यासाठी मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ३७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टँकरसाठी अधिग्रहीत ६० विहिरींसह टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत ३१६ विहिरींचा समावेश आहे. टँकरसाठी अधिग्रहीत केलेल्या ६० विहिरींमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १९ जालन्यामधील ३९ नांदेडमधील दोन विहिरींचा समावेश आहे. तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत केलेल्या ३१६ विहिरींमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५५ जालन्यातील ४३ परभणीतील ५२ बीडमधील १११ व धाराशिव मधील ५५ विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com