Animal With Lumpy Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Virus : ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासाठी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ मोहीम

Lumpy Skin Disease : नाशिक जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ आाजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ मोहीम राबवण्यात येणार आहे.

Team Agrowon

Lumpy Infection : नाशिक जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ आाजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ मोहीम राबवावी. गोठे स्वच्छ ठेवावेत, आवश्यकतेनुसार फवारणी करण्यात यावी. यासाठी मोहीम सर्व ग्रामसेवक व पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त विद्यमाने राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मित्तल यांनी बैठक घेतली. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. जिल्ह्यात एकूण ८ लाख ९५ हजार ५० गोवंशीय पशुधन आहे.

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असून सध्या जिल्ह्यामध्ये ४९ ईपी सेंटरमधून २५७ जनावरे बाधित झाली असून पशुवैद्यकामार्फत दैनंदिन उपचाराने ४६ पशुधन बरे झाले असून १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १९८ जनावरावर उपचार सुरू आहेत.

दररोज आजारी जनावरांची संख्या वाढत असल्याने सोमवारी (ता. २१) मित्तल यांनी  दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन सर्व क्षेत्रिय पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना शनिवारपर्यंत १०० लसीकरण करण्यासाठी सूचना दिल्या. यासाठी तालुका स्तरावर शासकीय अधिकारी कर्मचारी व खासगी पशुवैद्यकांची मदत घेऊन पथक तयार करून लसीकरण मोहीम स्वरूपात राबविण्यासाठी सूचित केले.

जनावरांना लसीकरण करून सहकार्य करा

सध्या जिल्ह्यामध्ये ७१ टक्के लसीकरण झालेले असून शनिवारपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. जनावरे आजारी होताच तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधावा व त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार करावेत. आजारी जनावरांना उबदार ठिकाणी, स्वच्छ जागेत बांधावे.

जनावरांना स्वच्छ पाणी व मऊ लुसलुसीत खाद्य द्यावे. जनावरांच्या आहारामध्ये क्षार मिश्रणे व जिवनसत्वे पूरक खाद्य म्हणून देण्यात यावी. सर्व पशुपालकांना आपल्या जनावरांना लसीकरण करून सहकार्य करावे व आपल्या जिल्ह्यामध्ये आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही या बाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन मित्तल यांनी पशुपालकांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

SCROLL FOR NEXT