Inauguration of Rice and Pulses Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Festival: ‘महाएफपीसी’तर्फे गुलटेकडी येथे तांदूळ महोत्सव सुरू

Inauguration of Rice and Pulses Festival: महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. (महाएफपीसी) आणि नाफेड ई-किसान मंडी यांच्या वतीने तिसऱ्या तांदूळ व कडधान्य महोत्सवाचे आयोजन गुलटेकडी येथील महाएफपीसी यार्ड, येथे करण्यात आले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. (महाएफपीसी) आणि नाफेड ई-किसान मंडी यांच्या वतीने तिसऱ्या तांदूळ व कडधान्य महोत्सवाचे आयोजन गुलटेकडी येथील महाएफपीसी यार्ड, येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन ‘सकाळ-ॲग्रोवन’चे संपादक-संचालक डॉ. आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी (ता.५) करण्यात आले.

‘महाएफपीसी’च्या वतीने राज्याच्या विविध भागांतील तांदूळ व कडधान्य उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गट, नव-उद्यमी, कंपनींना २० दालने उपलब्ध करून दिली आहेत. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

या निमित्ताने शेतकऱ्यांना खरेदीदार ग्राहकांशी थेट संवाद व माल विक्रीचे व्यासपीठ रास्तदरात उपलब्ध करून देण्यासाठी महाएफपीसीमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे योगेश थोरात यांनी सांगितले. यासाठी पुणेकर ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

शेतीमालाचे संकलन प्रभावीपणे करून एफपीओच्या माध्यमातून शेतीमाल बाजारात आणल्यास पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढू शकेल. ‘महाएफपीसी’सारख्या संस्थांनी बाजारजोडणीसाठी पुढाकार घ्यावा आणि एफपीओंनीही अशा संस्थांचा हात धरून बाजारविकास करणे योग्य ठरेल.
आदिनाथ चव्हाण, संपादक- संचालक अॅग्रोवन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT