
पुणे : ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार तांदूळ (Rice) मिळावा या उद्देशाने ग्राहक पेठेने (Grahak Peth) सुरू केलेल्या ३०व्या तांदूळ महोत्सवाला (Rice Festival) प्रारंभ झाला आहे. महोत्सवामध्ये भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या भागांतील थेट शेतकऱ्यांसह विविध राज्यांतील सुमारे ६० प्रकारचे वाण उपलब्ध असणार आहेत.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, आंबेमोहोरसह सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळदेखील उपलब्ध आहे.
पुणे ग्राहक पेठेच्या ३० व्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या हस्ते झाले. ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अॅण्ड कंपनीचे राजेश शहा आदी या वेळी उपस्थित होते.
राजेश शहा म्हणाले, ‘‘संपूर्ण देशभरातून १०० ते १२० प्रकारचे तांदूळ महाराष्ट्रात येतात. मागील ३० वर्षांत तांदळाच्या गुणवत्तेमध्ये फरक झाला आहे. आज ब्राउन राइसचे महत्त्व वाढत चालले आहे. त्यामुळे तांदूळ महोत्सवात यंदा ६० प्रकारचे विविध तांदूळ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.’’
सूर्यकांत पाठक म्हणाले, ‘‘महोत्सवाच्या निमित्ताने एका वेळेस ग्राहकांनी एकत्रितपणे १५० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास त्यांना शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तम प्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात रास्त दरात उपलब्ध आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.