Agriculture Minister Dattatray Bharne Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Minister : महायुती सरकारचे खाते बदल; राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची धुरा सोपवली आहे.

Dhananjay Sanap

Maharashtra Politics : अखेर महायुती सरकारमध्ये गुरुवारी (ता.३१) रात्री उशिरा खाते बदल करण्यात आला आहे. वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची धुरा सोपवली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या वर्षेपूर्ती आधीच दुसरा झटका बसल्याचे बोलले जात आहे.

मंत्री कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून महायुती सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठली. तसेच सर्वच स्तरातून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे महायुती सरकारच्या अडचणी वाढ झाली. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु कोकाटे यांच्या प्रकरणावरून महायुतीत दोन गट झाल्याची चर्चा होती.

https://mahasamvad.in/173972/

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकारची एक विकेट पडलेली आहे. त्यात कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर महायुती सरकारला बॅकफुटला जावं लागेल, असे एका गटाचे मत होते. तर दुसरा गट मंत्र्याच्या विधानांमुळे सरकारची प्रतिमा डागळत असल्याचा मुद्दा मांडत होता. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा न घेता 'डॅमेज कंट्रोल'साठी खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

मंत्री माणिकराव कोकाटे यांची सततची वादग्रस्त विधान  आणि पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन जुगार खेळण्याच्या प्रकारमुळे सरकारची नाचक्की झाली. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटे यांना मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सुनावले होते. त्यावेळी कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची चर्चा होती.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांमुळे सरकारची बदनामी होत असून पुढच्या वेळी थेट कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी त्यांना अभय दिल्याच्या चर्चेनं जोर धरला. तसेच विरोधकांनी टीकाही केली.

दरम्यान कोकाटे यांच्याकडील कृषी खातं भरणे यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु मंत्री कोकाटे यांना अवघ्या आठ महिन्यातच बाजूला सारण्यात आलं आहे. महायुती सरकारला वर्षपूर्ती पूर्वीच मंत्र्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी पवार अजित पवार गटाचे आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. भरणे यांनी २०१४, २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २०१९ साली महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री राहिले आहेत.

२०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भरणे अजित पवारांच्या गटासोबत राहिले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला. महायुती सरकारमध्ये भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु या खात्यावरून मंत्री भरणे नाराज असल्याची चर्चा होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

SMART Agri Project: ‘स्मार्ट’ पाऊल पुढे पडो

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

SCROLL FOR NEXT