Pune News : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीची लढतीत महायुतीला २८जागांवर यश मिळाले आहे. तर राज्यातील १९८ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीला यंदा म्हणावे तसे यश मिळाले नसून फक्त १ जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. तर काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.
महायुतीला यंदा पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी जनतेने कौल दिला असून भाजपला १२ ठिकाणी यश मिळाले आहे. शहादा मतदारसंघ (२) येथे राजेश पाडवी हे विजयी झाले असून त्यांचा ५३ हजार २०४ मतांनी विजयी झाला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पराभव पत्करावा लागला आहे. राजेश गावित यांना १ लाख ४६ हजार ८३९ मते मिळाली असून राजेंद्र गावित यांना ९३ हजार ६३५ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
तर भाजपचे अकोला पूर्व (३१) मतदारसंघातील उमेदवार रणधीर सावरकर, घाटकोपर पूर्वमधून (१७०) पराग शाह वडाळा (१८०) मतदारसंघातून कालिदास कोळंबकर निजयी झाले आहेत. तर शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण पाटील विखे विजयी झाले असून त्यांचा ७० हजार २८२ मतांनी विजय झाला आहे. येथे त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभाताई घोगरे मैदानात होत्या. प्रतिभाताई यांना ७४ हजार ४९६ मते मिळाली आहेत.
पुणे छावणी मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे १० हजार ३२० मतांनी विजयी झाले आहेत. कांबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा पराभव केला. साताऱ्यात शंभूराजे भोसले यांनी १लाख ४२ हजार १२४ मतांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमित कदम यांचा पराभव केला आहे. तर निलेश राणे यांनी कणकवली मतदार संघात भाजपला विजय मिळवून दिला आहे. राणे यांचा तब्बल ५८ हजार ७ मतांनी विजय झाला असून त्यांना १ लाख ८ हजार ३६९ मते मिळाली आहेत. राणे यांच्यासमोर येथे उद्धव ठाकरे गटाने तगडे आव्हान उभे करताना संदेश पारकर यांना संधी दिली होती. पारकर यांना ५० हजार ३६२ मते पडली आहेत.
तसेच यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील चांगले यश मिळाले असून दुपारपर्यंत ८ उमेदवार विजयी झाले आहेत. यात पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावित, बोईसर मतदार संघातून विलास तारे, भिवंडी ग्रामीणमधून शांताराम तुकाराम मोरे, महाडमधून भरतशेठ गोगावले, नेवासा येथून विठ्ठल लंघे विजयी झाले आहेत. तर दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदार संघातून विजय मिळवला आहे. पुरंदर मतदारसंघातून विजयबापू शिवतारे विजयी झाले असून कुडाळमधून निलेश राणे यांनी विजय मिळवला आहे.
अजित पवार यांचे ८ उमेदवार विजयी
यंदाच्या निवडणुकीत भाजप नेतृत्वातील महायुतीला चांगले यश मिळाले आहे. सध्या महायुती मजबूत स्थितीत असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे देखील ८ आमदार निवडणून आले आहेत. अजित पवार गटाचे अनिल पाटील अमळनेर मतदार संघातून विजयी झाले आहेत. अमरावतीतून सुलभा खोडके विजयी झाल्या आहेत. निफाड मतदारसंघातून दिलीपराव बनकर, नरहरी झिरवाळ दिंडोरी मतदार संघातून आमदार झाले आहेत. तसेच श्रीवर्धनमधून आदिती सुनील तटकरे यांच्यासह कोपरगावमधून आशुतोष काळे निवडणून आले आहेत. तर उहगीर मतदारसंघातून संजय बनसोडे विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीचा सुपडासाफ
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला असून काँग्रेसचे महत्वाचे नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. सध्याच्या स्थितीला काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नसून शरद पवार गटाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. शरद पवार गटाचे अभिजीत पाटील म्हाडा मतदारसंघातून विजयी झाले असून त्यांना १ लाख ३६ हजार ५५९ मते मिळाली आहेत. तर त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या रणजीत शिंदे यांचा ३० हजार ६२१ मतांनी पराभव केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.