Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Balasaheb Thorat, Prithviraj Chavan, Yashomati Thakur : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून अनेक दिग्गज नेत्यांची पिछेहाट होताना दिसत आहे.
Balasaheb Thorat, Prithviraj Chavan, Yashomati Thakur
Balasaheb Thorat, Prithviraj Chavan, Yashomati ThakurAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सुरूवातीचे कल हाती येत असून महायुतीने आघाडी घेतली आहे. या कलांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विविध ठिकाणी दिग्गज नेते पिछाडीवर पडले आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, लातूरचे दोन्ही देशमुख बंधूंना आघाडी घेता आलेली नाही. सध्याच्या घडीला स्थिती पिछाडीची असलीतरी अंतिम निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळच्या सत्रातील कलामध्ये महायुतीला २१५ जागा तर मविआ फक्त ५१ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजप १२५ जागांवर आघाडीवर असून शिंदेंची सेना ५५ जागांवर आघाडीवर आहे.

Balasaheb Thorat, Prithviraj Chavan, Yashomati Thakur
Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

अजित पवारांची राष्ट्रवादी ३५ जागांवर आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. मविआमधील काँग्रेसला २१ जागांवर आघाडीवर मिळाली असून शिवसेना (उद्धव ठाकरे) १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना १३ जागा आघाडीवर आहेत. यामुळे सध्या भाजपच राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान कराड दक्षिणमधून निवडणुकीच्या रिंगणात असलेले पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर असून येथे भाजपचे अतुल भोसले आघाडीवर आहेत. अतुल भोसले २८ हजार ३५४ मते मिळाली असून ते ३१२१ मतांनी आघाडीवर आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण यांना २५ हजार २३३ मते मिळाली आहेत.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर गेले असून ते आधी टपाली मतदानात आघाडीवर होते. पण आता ईव्हीएम मतमोजणीत ते पिछाडीवर पडले आहेत. येथे शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खटाळे यांनी ४ हजार ७५२ मतांची आघाडी घेतली आहे. थोरात सध्या २२ हजार ३०९ मतांवर आहेत.

Balasaheb Thorat, Prithviraj Chavan, Yashomati Thakur
Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

लातूरमध्ये देखील काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख पिछाडीवर असून भाजपचे उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर या आघाडीवर आहेत. येथे अमित देशमुख चाकूरकर यांच्या पेक्षा १ हजार ५४१ मतांनी पिछाडीवर आहेत. लातूर ग्रामीणमधून धिरज देशमुख हे पिछाडीवर आहेत.

असेच काहीसे चित्र तिवसा मतदारसंघात असून काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर देखील पिछाडीवर गेल्याचे दिसून येत आहे. यशोमती ठाकूर येथे ४ हजार ४३८ मतांनी पिछाडीवर आहेत. तर अचलपूरमधून प्रहारचे उमेदवार बच्चू कडू देखील पिछाडीवर असून ते भाजपचे प्रविण तायडेंपेक्षा १४०० मतांनी पिछाडीवर आहेत.

बारामतीमध्ये काकाची बाजी

बारामतीमधील काका पुतण्याच्या लढतीत सुरुवातीच्या कलात काकांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावर २७ हजार ७८८ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ५४ हजार ७११ मते आतापर्यंत मिळाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com