Electricity Meter Agrowon
ॲग्रो विशेष

New Electricity Connection : नाशिक परिमंडळात १४०२ नवीन वीजजोडण्या

Mahavitaran : सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यातच महावितरणच्या नाशिक परिमंडळात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Nashik News : सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यातच महावितरणच्या नाशिक परिमंडळात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर वीज बिलावरील नावात बदलाचे प्रलंबित ६६४ अर्ज कार्यवाही झाली असून तसेच महावितरण पोर्टलवरील वीज ग्राहकांचे ३५५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

राज्य शासनाने सेवा हक्क कायदा अंमलात आणला आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.

त्यानुसार नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी दिले आहेत. २८ एप्रिल ते १२ मे दरम्यान सेवा हक्क पंधरवडा दरम्यान प्रलंबित नवीन वीजजोडणी, वीज बिलावरील नावात बदल व दुरुस्ती तसेच विविध तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार नाशिक परिमंडळात नवीन वीजजोडणीचे १ हजार ९८० अर्ज प्रलंबित होते. यातील १ हजार ४९२ अर्जदारांना सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यातच नवीन वीजजोडणी देण्यात आली असून उर्वरित ५७८ अर्जावर कार्यवाही सुरू आहे.

तर वीज बिलावरील नावात बदल करण्याबाबतच्या ६८९ अर्जापैकी ६६४ अर्जावर कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. महावितरणच्या पोर्टलवर आलेल्या ५२२ ऑनलाइन अर्ज अथवा तक्रारींपैकी ३५५ प्रकरणांचे निवारण करण्यात आले आहे. उर्वरित १६७ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT