Nanded Apmc Election
Nanded Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Market Committee Election : नांदेड बाजार समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फार्म्यूला ठरला

Team Agrowon

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Nanded Market Committee Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा फार्म्यूला ठरला आहे. काँग्रेस १३, राष्ट्रवादी तीन, तर शिवसेना (उबाठा) पक्ष दोन जागा लढवणार आहे. यामुळे नांदेडसह पाच बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत.

याबाबत महाविकास आघाडीतील घटकपक्ष जागा वाटपासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बोलणीतून जागावाटपाचा फार्म्यूला ठरला असून, काँग्रेस १३, राष्ट्रवादी तीन, तर शिवसेना पक्ष दोन जागा लढविणार आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने सेवा सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण सात जागेसाठी गांधी पवार, नीलेश देशमुख, श्यामराव टेकाळे, नागोराव आढाव, सत्यजित भोसले या पाच काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान आलेगावकर, तर शिवसेना पक्षाचे भुजंग पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

यात आघाडीचे उमेदवार सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातून गायत्री गजानन कदम (काँग्रेस), तर कमल वाघ (राष्ट्रवादी काँग्रेस) सेवा सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती-निळकंठ मदने (काँग्रेस) ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण-गंगाधर शिंदे (काँग्रेस) संजय लहानकर (काँग्रेस) ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती-जमाती- नाना पोहरे (राष्ट्रवादी काँग्रेस) ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल घटक -ज्ञानेश्‍वर बाबूराव राजेगोरे (काँग्रेस) अडत व व्यापारी मतदार संघ सदाशिव देशमुख (काँग्रेस), ओमप्रकाश पोकर्णा (काँग्रेस), तर हमाल मापाडी मतदार संघातून भुजंग कसबे (काँग्रेस) निवडणूक लढवत आहेत.

नायगाव बाजार समितीची निवडणुक बिनविरोध..

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत काँग्रेस, भाजपने पॅनेल बनविले होते. यानंतर काँग्रेस, भाजपच्या पदाधिकाऱ्यां‍यांनी एकत्रित बसून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यात काँग्रेस १२, तर भाजप सहा जागी संचालक निश्‍चित करून निवडणूक बिनविरोध केली आहे.

शिवसेनेचे बबन बारसे बिनविरोध..

सेवा सहकारी संस्था (इमाव) मतदार संघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे बबन बारसे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT