Farmers Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Subsidy : राष्ट्रीयकृत बँकेचे खाते जोडलेल्यांना प्रोत्साहन अनुदान नाही, सहाय्यक निबंधकांच्या सभेतच गोंधळ

Shirol Farmers : शिरोळ तालुक्यात कर्जमाफीसाठी २१ हजार ४०० शेतकऱ्यांनी अर्ज केला होता.

sandeep Shirguppe

Maharashtra Farmers Subsidy : राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर झाली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते जोडलेले आहे, त्यांना पैसे न मिळाल्याने शिरढोण, टाकवडे, नांदणी, कवठेसार, शिरोळ यासह परिसरातील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बँकेत सहाय्यक निबंधकाच्या सभेतच अनुदानावरून गोंधळा घातला. अखेर सहाय्यक निबंधक ए.बी.नादरे यांनी अग्रणी बँकेचे प्रमुख यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.

शिरोळ तालुक्यात कर्जमाफीसाठी २१ हजार ४०० शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. यात प्रत्यक्षात १९ हजार ८७१ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७२ लाखाची कर्ज माफी झाली आहे. यात अपात्र शेतकऱ्यांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते.

यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काही बाबी पटवून दिल्यानंतर शासनाने काही त्रुटी दूर केल्या होत्या. यात पात्र झालेले शेतकरी ज्यांचे केडीसी बँकेत खाते आहे अशांना अनुदान मिळाले आहे, मात्र ज्या शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे अशांना अनुदान मिळालेले नाही.

त्यामुळे तालुक्यातील असे शेतकरी एकत्रित येऊन जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयात नादरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या सभेतच येऊन गोंधळ घातला. अखेर नादरे यांनी अग्रणी बँकेचे प्रमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर सर्व शेतकऱ्यांची नावे व गावे देण्याचे सांगितल्यानंतर शेतकरी शांत झाले.

यावेळी सहाय्यक सहकार अधिकारी व्ही.जी.खोत यांच्याकडे यादी व निवेदन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. यावेळी विश्वास बालीघाटे, मनोज चौगुले, राजेंद्र हासूरे, बाळासो यमकनमर्डे, दिपक पाटील, किरण पाटील, सुभाष पाटील, उमर शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT