Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard Auction : कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंब्याला मिळाला उच्चांकी दर

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागेतील फळांच्या विक्रीसाठी महाटेंडर प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली.

Team Agrowon

Ahilyanagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागेतील फळांच्या विक्रीसाठी महाटेंडर प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार फळझाडांची लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये यावर्षी ७१ लाख इतका उच्चांकी दर मिळाला आहे. गेल्या वर्षी याच क्षेत्रासाठी ३८ लाखांचा दर मिळाला होता.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील ४० हेक्टर क्षेत्रावर आंब्याची ३०७१ इतकी उत्पादनक्षम झाडे आहेत. त्यात प्रामुख्याने केशर, लंगडा, हापूस, वनराज, तोतापुरी, रत्ना, सिंधू, मल्लिका, दुधपेडा, नीलम, आम्रपाली, पायरी या वाणांचे आंबे आहेत. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आंबा फळापासून मिळणाऱ्या महसुलामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

विद्यापीठातील आंबा फळे ही चव व गुणवत्तेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विद्यापीठातील आंबा फळबागा घेण्यासाठी व्यापाऱ्यांचा यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी हवामानाची मिळालेली साथ व संबंधित विभागाने प्रक्षेत्रावरील आंबा फळबागांचे एकदाच आलेल्या मोहराचे केलेले सुयोग्य व्यवस्थापन या बाबी कारणीभूत ठरल्या आहेत.

विद्यापीठातील आंबा बागांचे बारमाही व्यवस्थापन हे तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि उद्यानविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

उद्यानविद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर यांच्या आंबाबागेच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे यावर्षी फळधारणा दुप्पट झाली असून मागील दहा वर्षांचा उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे.

उद्यानविद्या प्रक्षेत्रावरील आंबा फळबागांच्या महसुलामध्ये दर वर्षी वाढ होत असून मागील चार वर्षांत त्यात चारपट वाढ झालेली आहे. यावर्षी विभागातील आंबा फळबागांच्या ई-लिलावाने उच्चांक गाठत सर्वोत्तम दर मिळवून दिला. आंबा उत्पादन वाढीसाठी उद्यानविद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर, विजय पवार, राहुल पाटील, वसंत बाचकर, बाबासाहेब होडगर, सचिन शेळके, रमेश अनाप, पुंजाहरी बाचकर, दीपक पवार, कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT