Mahareshim Abhiyaan Agrowon
ॲग्रो विशेष

Mahareshim Campaign : पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानास सुरुवात

Silk Farming : राज्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद, रेशीम संचालनालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर ते २० डिसेबर या कालावधीत महारेशीम अभियान राबविले जाणार आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद, रेशीम संचालनालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर ते २० डिसेबर या कालावधीत महारेशीम अभियान राबविले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात महारेशीम अभियानाची सुरुवात सोमवारपासून (ता. २०) करण्यात आली. पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व रेशीम रथाला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

या वेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, पुणे जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी संजय फुले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, विभागीय सांख्यिकी सीताराम कोलते, रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक संदीप आगवणे, वरिष्ठ क्षेत्र सहायक आर. टी. पाटील, क्षेत्र सहायक एस. एस. मैडकर, रिअरिंग ऑपरेटिव्ह एस. आर. तापकीर आदी उपस्थित होते.

पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी म्हणाले, की अभियानकाळात जिल्ह्यामध्ये नव्याने रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात एकराच्या रेशीम शेतीतून लखपती झालेले असंख्य शेतकरी असून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य रेशीम शेतीमध्ये असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे म्हणाल्या, की सुशिक्षित बेरोजगार शेतकरी युवकांनी नोकरीच्या मागे न धावता रेशीम शेतीकडे वळावे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या कोषांची खरेदी केली जात असल्याने कोष विक्रीकरिता कर्नाटकात जायची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT