Prasenjit Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Marketing Federation : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ उपाध्यक्षपदी प्रसेनजित पाटील

Election of Maharashtra State Cotton Marketing Federation : महाराष्ट्र राज्य पणन महासंघांच्या निवडणुकीत जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश पदाधिकारी प्रसेनजित पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र राज्य पणन महासंघांच्या सोमवारी (ता.१२) झालेल्या निवडणुकीत जळगाव जामोद (जि. बुलडाणा) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश पदाधिकारी प्रसेनजित पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

पणन महासंघाची ७ जानेवारीला निवडणूक झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी झालेल्या मतमोजणीत ओबीसी मतदारसंघातून संपूर्ण राज्यातून प्रसेनजित पाटील यांनी चंद्रकांत बाविस्कर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

या निवडणुकीत काँग्रेसचे ८, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे चार, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ४ व भाजपचा एक संचालक निवडून आलेला आहे. सोमवारी (ता.१२) अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झाली.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वांत जास्त आठ संचालक असल्याने त्यांना अध्यक्ष पद तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला उपाध्यक्ष पद ठरले. त्यानुसार काँग्रेस आमदार तथा संचालक कुणाल पाटील हे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी नेते प्रसेनजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन वाघ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्ह्याध्यक्ष एम. डी. साबीर, शहराध्यक्ष रमेश ताडे, राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते करीम खान, बाजार समिती संचालक विष्णू आटोळे, मोहसीन खान, आशिष वायझोडे, विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे, खरेदी विक्री अध्यक्ष अजहर पटेल,मुश्ताक भाईजान, शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे, पवन वाघ,संकेत रहाटे, दादाराव धंदर,वसीम पटेल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Women Employment Scheme: बिहार सरकारच्या ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतून महिलांना मिळणार १० हजार रुपये

Crop Insurance : पीकविम्याची थकित १६० कोटी भरपाई वाटप करा

Cashew Crop Insurance : विमा परताव्याची रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना प्रतीक्षा

Illegal Fishing : अवैध मासेमारीला चालना मिळणार

Kadba Kutti Machine Scheme: शेतकऱ्यांना सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार ५० टक्के अनुदान

SCROLL FOR NEXT