Memorandum of Understanding Agrowon
ॲग्रो विशेष

Memorandum of Understanding: जलस्रोत पुनरुज्जीवनासाठी शासन, ‘बीजेएस’ यांच्यात करार

Government and BJS: मृद्‍ व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यामध्ये मंत्रालय, मुंबई येथे सोमवारी (ता.३) रोजी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ (जलस्रोत पुनरुज्जीवन) या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: मृद्‍ व जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यामध्ये मंत्रालय, मुंबई येथे सोमवारी (ता.३) रोजी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ (जलस्रोत पुनरुज्जीवन) या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

या प्रसंगी मृद्‍ जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आश्‍विनी भिडे, मृद्‍ व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, ओएसडी प्रिया खान, बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन, राज्याध्यक्ष केतन शहा, राज्य सचिव प्रवीण पारख, प्रकल्प संचालक दीपक सहा आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेची अंमलबाजवणी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. येत्या काळात गावागावांत जाऊन जनजागृती करणे, प्रचार-प्रसार करणे, समुदाय सहभाग व क्षमता बांधणी करणे, बीजेएसच्या मोबाइल अॅपद्वारे सर्व ग्रामपंचायतींपर्यंत ही योजना पोहोचविणे तसेच माहिती जमा करून शासनापर्यंत पोहोचविणे इत्यादी बाबींचा या सामंजस्य करारामध्ये समावेश आहे.

बीजेएसने आतापर्यंत पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. तसेच महाराष्ट्र पाणीदार बनविण्यासाठी शासन बीजेएसचा उपयोग करून घेणार असल्याचे सांगितले. तर संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन उभे करून राज्य शासनाच्या ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बीजेएस कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही शांतिलाल मुथ्था यांनी दिली.

गेल्या एक-दीड दशकातील ‘बीजेएस’चे महाराष्ट्रातील पाण्याचे काम सर्वोत्कृष्ट आहे. उच्च दर्जाची जनजागृती व क्षमता निर्माण करण्यात बीजेएस प्रावीण्य आहे. बीजेएसच्या सहकार्याने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना यशस्वी होणार यात शंका नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Dispute : ‘एनएमआरडीए’च्या कारवाईला हायकोर्टाचा दणका

Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

Onion Market : आठवड्याहून जास्त काळ बाजार समित्यांचे काम राहणार बंद

APMC Land : बाजार समितीची जमीन कवडीमोलाने विकण्याचा घाट

Palm Cultivation: यंदा देशातील पाम लागवड क्षेत्रात ५२,११३ हेक्टरने वाढ, 'या' राज्यांत सर्वाधिक

SCROLL FOR NEXT