Agriculture Land Agrowo
ॲग्रो विशेष

Bhu-Pranam Land Record Centres: राज्यात ३० ‘भू-प्रणाम’ भूमापन केंद्रे सुरू होणार

Maharashtra Land Records: संगणकीकृत मिळकत पत्रिका, सात-बारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज नाही.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: शेतकऱ्यांना शेतीसंबधी लागणारे विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागत होते. परंतु संगणकीकृत मिळकत पत्रिका, सात-बारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज नाही. सेतू सुविधा केंद्रांपेक्षा अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या ‘भू-प्रणाम’ केंद्रामधून मिळणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अशी अत्याधुनिक केंद्रे उभारण्यात येत आहेत. येत्या एप्रिलपासून ही सुविधा केंद्रे सुरू होणार आहेत. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. कित्येकदा भूमी अभिलेख विभागाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा वाईट अनुभव येतो.

या कार्यालयामधील मूळ कामाला विलंब होणे आदी होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी तसेच नागरिकांना उत्तम सेवा-सुविधा मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्यातील ३० जिल्हा मुख्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्रांप्रमाणेच अत्याधुनिक सुविधा केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधा केंद्रांना ‘भू प्रणाम’ केंद्र असे नाव देण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि नगर भूमी अधिकारी कार्यालयांच्या ठिकाणी ही सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक सुविधा केंद्रासाठी राज्य शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने मागील वर्षीपासूनच भूमपान केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. आता मात्र या प्रस्तावास मूर्त रूप आले आहे. त्यामुळे आता राज्यातील ३० जिल्ह्यांत ‘भू-प्रणाम’ केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार राज्यात भू-प्रणाम केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या ३० जिल्ह्यांत केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित जिल्ह्यांतही ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, भूमी अभिलेख विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT