Soybean Procurement agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी १३ पर्यंतमुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव

Deadline extension Demand: राज्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अजूनही रांगा असल्याने १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे गुरुवारी (ता. ६) केली. सोयाबीन खरेदीची मुदत सायंकाळपर्यंत असताना चार वाजता प्रस्ताव पाठविला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या अजूनही रांगा असल्याने १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे गुरुवारी (ता. ६) केली. सोयाबीन खरेदीची मुदत सायंकाळपर्यंत असताना चार वाजता प्रस्ताव पाठविला आहे.

राज्यात १४ लाख टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, पहिल्यापासून सोयाबीन खरेदीचा घोळ सुरू होता. तरीही दोन वेळा मिळालेल्या मुदतवाढीमुळे आतापर्यंत १० लाख ७९ हजार टन सोयाबीन खरेदी झाली आहे.

मात्र, लातूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टांइतकी खरेदी न झाल्याने मुदतवाढीची मागणी होत आहे. काही खरेदी केंद्रांवर वाहनांच्या अजूनही रांगा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणन विभागाला मुदतवाढीची मागणी करण्याचे निर्देश गुरुवारी दिले.

केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तीन लाख टन खरेदी कमी झाल्याने ही मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार सहकार व पणन विभागाने गुरुवारी तातडीने प्रस्ताव तयार करून सायंकाळी चार वाजता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. गुरुवारी उशिरा प्रस्ताव दाखल केल्याने रात्री उशिरापर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, असे पणन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT