Maharashtra Bhushan Award २०२५ : जगविख्यात किर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरूवार (ता.२०) घोषणा केली. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना वयाच्या १०० व्या वर्षी पुरस्कार मिळाल्याने सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
राम सुतार यांनी वयाची १०० वर्षे पार करूनही शिल्प तयार करण्यात व्यस्थ असतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
राम सुतार हे मुळचे धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावचे आहेत. १९ फेब्रुवारी १९२५ रोजी त्यांच्या जन्म झाला. राम सुतार यांनी देशभरात अनेक शिल्पे उभारली आहेत. गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा आहे. तसेच अयोध्येच्या राम मंदिरात अनेक उत्कृष्ट मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. यापैकी एक मूर्ती जटायूची आहे, ती मूर्ती देखील राम सुतार यांनी बनविली आहे, पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांची प्रशंसा केली आहे.
अटल सरकारने शिल्पकार राम सुतार यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते आणि त्यांना टागोर संस्कृती पुरस्काराने सन्मानित केले होते. राम सुतार यांचा आवडता पुतळा महात्मा गांधींचा आहे आणि त्यांनी महात्मा गांधींचे सर्वाधिक पुतळे बनवले आहेत.
राम सुतार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील सुतार होते. कठीण परिस्थितीतही राम सुतार हे अभ्यासात पहिल्या नंबरवर रहायचे. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. त्यांचे गुरू रामकृष्ण जोशी यांना त्यांच्यात क्षमता दिसली. आपल्या गुरुंच्या सल्ल्यानुसार राम सुतार यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. जेजे स्कूलमध्येच शिल्पकलेकडील माझा कल वाढल्याचे ते सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.