Sadabhau Khot Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Ban : ऊसबंदी हटवण्यासाठी सदाभाऊ खोतांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट

Interstate Sale of Sugarcane : ऊसाची झोनबंदी मागे घ्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.

Team Agrowon

Maharashtra Bans Sugarcane : राज्य सरकारने या वर्षीच्या हंगामात उसावर झोनबंदी लावली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. ही झोनबंदी मागे घ्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. यावर हा निर्णय तत्काळ मागे घेणार असल्याचे आश्‍वासन सहकार मंत्र्यांकडून दिले असल्याची माहिती रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी दिली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे येथे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सोमवारी (ता. १८) भेट घेऊन या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी रयत क्रांतीचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, राज्याच्या ऊसदर नियंत्रक समितीचे सदस्य प्रा. सुहास पाटील, सचिन नलावडे, अनिल पाटील, सयाजी मोरे आदी उपस्थित होते.

या वेळी रयत क्रांतीची ही भूमिका सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पटली. याबाबतीत सर्वांगीण चर्चा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, तसेच राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांनी सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि तत्काळ आपण हा निर्णय मागे घेणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT