Sugar Factory Owners Kolhapur : महाराष्ट्र विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने निवडणुकांचे रणांगण पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास डझनभर साखर कारखान्यांचे चेअरमन अथवा संचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. दरम्यान यामुळे उसाचा गळीत तब्बल महिनाभर लांबणीवर पडला. शनिवार (ता. २३) अनेक साखर कारखानदारांना दणका बसण्याची शक्यता आहे.
कागल विधानसभा मतदार संघातून जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले संताजी घोरपडे सहकार साखर कारखान्याचे सर्वेसर्वा हसन मुश्रीफ यांनी ६ व्या फेरी अखेर ४ हजार ५०० मतांनी आघाडी घेतली आहे. तर मुश्रीफ यांच्या विरोधात शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे शरद पवार गटाकडून निवडणुक लढवत होते.
इचलकंरजी, हातकणंगले विधानसभा
इचलकरंजी मतदार संघातून जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल आवाडे यांनी महायुतीकडून निवडणूक लढवत आपले अस्तीत्व कायम ठेवले आहे. ६ व्या फेरी अखेर आवाडे यांनी ११ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
शिरोळ विधानसभा
शिरोळ विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार शरद साखर सहकारी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवत १२ व्या फेरी अखेर २४ हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर यांच्याविरोधात दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांनी कंबर कसली होती.
करवीर तालुक्यातून हे कारखानदार
करवीर विधानसभा मतदार संघातून दिवंगत आमदार भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.एन.पाटील यांचा मुलगा राहुल पाटील रिंगणात आहे यामध्ये ६ व्या फेरीपर्यंत राहुल पाटील यांनी किरकोळ मतांची आघाडी घेतली होती. परंतु विरोधात असलेल्या कुंभी साखर कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ७ व्या फेरीमध्ये ७ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या करवीर तालुक्यातील दक्षिण मतदार संघातून डी. वाय. पाटील कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांना धक्का बसताना पहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अमल महाडिक यांनी ११ व्या फेरी अखेर १० हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
राधानगरी विधानसभा
जिल्ह्यातील सर्वात उच्चांकी दर देणाऱ्या बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील राधानगरी भुदरगड तालुक्यातून जोरदार तयारी केली होती. परंतु विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी विकासकामांच्या जोरावर ७ व्या फेरीपर्यंत जोरदार आघाडी घेतली आहे.
पन्हाळा विधानसभा
महायुतीचे घटकपक्ष असलेल्या वारणा साखर कारखान्याचे चेअरमन जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष विनय कोरे यांनी पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातून पायाला भिंगरी बांधली होती. तर विश्वास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी भावनीक साद घातली होती. यामध्ये सत्यजीत पाटील यांनी ८ व्या फेरी अखेर १०० मतांनी आघाडी घेतली आहे.
चंदगडमधून धक्कातंत्र
चंदगड विधानसभा मतदार संघातून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची मुलगी नंदाताई बाभूळकर तर आजरा सहकारी साखर कारखान्याचे अप्पी पाटील आणि अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे रिंगणात होते यामध्ये शिवाजी पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.