Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांपैकी भाजपला १३ जागांवर आघाडी आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागांवर आघाडी आहे. महायुती २१ जागांवर तर महाविकास आघाडी १४ जागांवर आघाडी घेताना दिसत आहे.
Maharashtra Vidhansabha Election Result
Maharashtra Vidhansabha Election ResultAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Vidhansabha Election Result Live Update : शरद पवार यांचा पारंपरिक गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगली आघाडी दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांपैकी भाजपला १३ जागांवर आघाडी आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागांवर आघाडी आहे. महायुती २१ जागांवर तर महाविकास आघाडी १४ जागांवर आघाडी घेताना दिसत आहे. 

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पश्चित महाराष्ट्राच्या वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली होती. शरद पवार यांना शह देण्यासाठी सत्ताधारी भाजपनेही अजित पवार यांना चांगली साथ दिली. तसेच भाजपने शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी रणनिती आखली होती. या रणनितीला यश येताना सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून येत आहे. 

Maharashtra Vidhansabha Election Result
Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

सुरुवातीच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांपैकी १३ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडील घेतली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार १० जागांवर आघाडीवर आहेत. त्याशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी ५ जागांवर आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ३ जागांवर आघाडीवर होती. तर काॅंग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात ४ जागांवर आघाडी आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनाला पश्चिम महाराष्ट्रात एकाही जागेवर सध्यातरी आघाडी घेता आली नाही. 

Maharashtra Vidhansabha Election Result
Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही शरद पवार यांना लोकसभेत चांगले यश मिळाले होते. हाच कित्ता शरद पवार विधानसभा निवडणुकीतही गिरवतील, असा कयास लावला जात होता. सुरुवतीच्या कलांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात शरद पवार यांच्या पक्षाला ११ जागांवर आघाडी दिसून येत आहे. 

बारामती मतदारसंघात अजित पवार विरुध्द पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात लढाई आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. जसजशी मतमोजणी पुढे जाईल तसे या कलांमध्ये बदल होत जाईल.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com