Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: राज्यात आठ पालक संचालकांची निवड; कृषी आयुक्तांचा नवा निर्णय!

Guardian Directors: राज्यात आठ पालक संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी या अधिकाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी प्रक्षेत्र भेटी आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ही नियुक्ती तीन महिन्यांसाठी असणार आहे.

मनोज कापडे

Pune News: कृषी आयुक्त सूरज मांढरे आता ‘अॅक्शन मोड’वर आलेले आहेत. त्यांनी राज्याच्या आठ विभागांसाठी पालक संचालकांची नियुक्ती केली असून, आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना प्रक्षेत्रावर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कृषी आयुक्तालयामार्फत विविध योजना, उपक्रम राबवले जातात. सरकारी ध्येय धोरणांबाबत क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणी व संनियंत्रणाचे काम संचालकांवर असते. मात्र क्षेत्रीय पातळीवरील अडचणींचे निराकरण होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आढावा घेण्याची गरज असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी पालक संचालक नियुक्त केले जात आहेत, असे आयुक्तालयाने म्हटले आहे.

‘प्रत्येक संचालकाने नेमून दिलेल्या विभागाचा आढावा घ्यावा व त्यासाठी दोन महिन्यांतून किमान एकदा व कमाल तीनदा दौरा करावा. परंतु दौरा करताना शासकीय बैठका, आयुक्तालयातील कामाची निकड पाहून नियोजन करा, अशा सूचना श्री. मांढरे यांनी दिल्या आहेत. प्रक्षेत्र भेटी देताना केवळ यशोगाथा न तपासता काही नावीन्यपूर्ण बाबी आहेत का ते पाहावे. कृषिविषयक प्रकल्प राबवताना काय अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी प्रकल्पाला किंवा प्रकल्पधारक शेतकऱ्याची भेट घ्यावी, असेही आयुक्तांनी सुचवले आहे.

एका संचालकाच्या म्हणण्यानुसार, आयुक्तांनी पालक संचालक नियुक्तीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यापूर्वी हा प्रयोग राज्यात राबवलेला होता. मात्र नवीन आयुक्त येताच दुर्लक्ष होत गेल्यामुळे पालक संचालकाचा प्रयोग पुढे बंद पडला होता. या संकल्पनेमुळे आयुक्तालयातील वरिष्ठांना क्षेत्रीय पातळीवरील समस्या अधिक बारकाईने अभ्यासता येतात. पालक संचालकांनी दौरा करताच आठवड्याच्या आत आयुक्तांना अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

...असे आहेत पालक संचालक

- फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, पुणे

- आत्मा संचालक अशोक किरनळ्ळी, छत्रपती संभाजीनगर

- विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी, नाशिक

- प्रक्रिया व नियोजन संचालक विनय आवटे, कोकण

- निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, अमरावती,

- नियोजन व अंदाजपत्रक सहसंचालक रविशंकर चलवदे, नागपूर

- विस्तार व प्रशिक्षण सहसंचालक मेघना केळकर, कोल्हापूर

- आस्थापना सहसंचालक गणेश घोरपडे, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT