Sant Tukaram Maharaj Mahapuja Agrowon
ॲग्रो विशेष

Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराज पालखीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा

Mahapuja Ceremony: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इनामदार वाड्यात आगमन झाल्यानंतर गुरुवारी शासकीय महापूजेनंतर भक्तिमय वातावरणात पालखीने देहूनगरीतून प्रस्थान केले. जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पादुकांचे पूजन आणि आरती पार पडली.

गणेश कोरे

Pune News: श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी आल्यानंतर गुरुवारी (ता. १९) जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून आरती झाली.

या वेळी पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलिस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव मोरे, ह.भ.प दिलीप मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते.

शासकीय महापूजा झाल्यानंतर मान्यवरांचा मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापूजेनंतर पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले.

देहू नगरीत गुरुवारी सकाळपासूनच पावसाचा जोर होता. वारकऱ्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. टाळमृदंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी... ‘ग्यानबा तुकाराम, माउली, माउली’चा गजर.. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...

अशा भक्तिमय वातावरणाने देहूनगरी भारून गेल्याचा अनुभव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यास मिळत होता. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. इनामदार वाड्यातून पालखीच्या प्रस्थानापूर्वीच वारकऱ्यांचे आकुर्डी मुक्कामाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT