Mahanand Dairy Agrowon
ॲग्रो विशेष

Mahanand Dairy : महानंद डेअरीचा कारभार 'एनडीडीबी'च्या दावणीला

National Dairy Development Board : राज्य सरकारकडून या संदर्भातील निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर महानंद डेअरी एनडीडीबीला देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : एकीकडे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दुधाला मिळणाऱ्या दरामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच आता राज्यातील महत्त्वाची सहकारी दूध संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचा (महानंद) कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे (एनडीडीबी) देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणाऱ्या सहाकरी दूध संघ एनडीडीबीकडे चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.

महानंद डेअरी एनडीडीबीला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय दूध संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. याबाबतचा संचालक मंडळाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून या संदर्भातील निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर महानंद डेअरी एनडीडीबीला देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस आर्थिक तोट्यामुळे महानंद डेअरी अडचणीत येत आहे. त्यामुळे महानंद डेअरी एनडीडीबीला चालविण्यासाठी देण्याऐवजी राज्यातील एखाद्या सक्षम अशा सहकारी दूध संघाला महानंद चालविण्यासाठी द्यावी, अशी मागणी सहकारी दूध संघांनी केली आहे.

गुजरातला पायघड्या

गेल्या काही दिवसांत राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खेळता पैसा देणारा दुग्धव्यवसायही राज्याबाहेर द्यायचा घाट घातला जात आहे. या निर्णयामुळे गुजरातला पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

नवले म्हणाले की, राज्य सरकारने सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष केले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. विधीमंडळामध्ये घोषणा करूनहीअद्याप शेतकऱ्यांना दुधासाठीचे पाच रुपयांचे अनुदान दिलेले नाही. दूध अनुदानाबाबत सरकार अजूनही निर्णय घ्यायला तयार नाही. दुसरीकडे मात्र गुजरातला पायघड्या घालत सबंध सहकाराशी निगडीत व्यवसाय बहाल केला जात आहे.

राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी आणि महानंद सारखा ब्रँड राज्याच्याचवतीने कसा विकसित होईल, यासाठी प्रयत्न करावेत. राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही नवले यांनी केली आहे.

महानंद डेअरीचे महत्त्व

महानंद ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी दूध संस्थाची शिखर संस्था आहे.

महानंदमार्फत राज्यातील सहकारी दूध संघांच्या दुधाची खरेदी-विक्री केली जाते.

महानंदचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात असून प्रामुख्याने मुबंईत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT