NDDB Aid : जिल्हा दूध संघाला ‘एनडीडीबी’ चे आर्थिक साह्य मिळणार : शिंदे

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करत आहोत.
NDDB Aid
NDDB Aid Agrowon
Published on
Updated on

सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (District Co-operative Milk Producers Union) आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करत आहोत. दूध संस्थांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासह दूध संकलन (Milk collection) वाढवण्यातही यश मिळत आहे.

NDDB Aid
Sugar Mill : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी साखर कारखाना कटिबद्ध

त्याशिवाय नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) यांच्याकडेही मदतीचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच त्यांच्याकडूनही दूध संघाला आर्थिक साह्य मिळणार आहे, अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. श्री. शिंदे म्हणाले, की एनडीडीबीकडून दूध संघाच्या मूळ तांत्रिक यंत्रणा बदलण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्हा दूध संघाचे शीतकरण केंद्र व प्रक्रिया केंद्र केगाव येथील दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्रकल्प यासह विविध यंत्रणा अद्ययावत व सक्षम केल्या जाणार आहेत. दूध संघाचे संकलनही वाढवण्यात येत आहे. गाव तेथे दूध संकलन केंद्र योजना राबवत आहोत. प्रतिदिन १० हजार लिटरवर असणारे संकलन आज ४० हजार लिटरवर पोचले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com