APMC Election
APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Mahagaon APMC Election : महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

Team Agrowon

Yavatmal News : आतबट्ट्याच्या व्यवहारात महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Mahagao Agriculture Produce Market Committee Election) दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. विकासकामांची नौटंकी करीत मावळत्या संचालक मंडळाने बाजार समितीची एक कोटी रुपयांची ठेव वाऱ्यावर उधळली.

आता या मरणासन्न संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सहकार क्षेत्रातील इच्छुकांनी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची येत्या २८ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. शेतकरी सभासदांना उमेदवारीची मुभा असली तरी ज्या गटात उमेदवारी दाखल करावयाची आहे. त्या गटातील सूचक व अनुमोदकांची स्वाक्षरी घेणे गरजेचे आहे. एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत.

मागील सहा वर्षांत बाजार समितीत झालेल्या उलाढालींमुळे शेतकरी सभासद कमालीचे अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीचे बाजार समितीत वर्चस्व असले तरी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक आडे यांनी संचालकांशी अर्थपूर्ण मैत्री करून यापूर्वी सभापतिपद बळकावले होते.

बाजार समितीचे प्रवेशद्वार, निरुपयोगी शेडवरील टीनपत्रे, एक पोते धान्याची आवक नसलेल्या बाजार समितीला वॉलकंपाउंड, मंडीकडे जाणारा निकृष्ट सिमेंट रस्ता अशा अनावश्यक विकासकामांवर किमान एक कोटीची जुनी ठेव उधळण्यात आली.

आता बाजार समितीच्या गंगाजळीत एक रुपयाही शिल्लक नाही. या सर्व कामगिरीचे श्रेय मावळत्या संचालक मंडळाच्या नावावर आहे. आज रोजी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून दहा कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, या वेतनाचे २७ लाख रुपये कुठून द्यावेत, हा प्रश्न आहे.

अवसायनाच्या काठावर असलेल्या बाजार समितीची निवडणूक हा विनोदाचा विषय झाला असला तरीही राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी सहकार सम्राटांची निवडणुकीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

कोणाची आघाडी, कोणाची बिघाडी

पाचही पक्षांनी स्वतंत्र बैठका घेऊन आपापली रणनीती तयार केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचा तूर्तास वरचष्मा दिसत असला तरी अति महत्त्वाकांक्षी नेते मंडळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT