Bribery Case Agrowon
ॲग्रो विशेष

Bribery Case : महा-ई-सेवा केंद्रचालक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Team Agrowon

Pune News : महा-ई-सेवा केंद्रचालकाने तक्रारदाराकडून उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेट काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २ हजार ५०० रुपये स्वीकारताना केंद्रचालकाला ताब्यात घेतले.

दिघी येथील गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्रचालक १ संतोष वाळके व २ श्रीमती नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे आमची तहसील कार्यालयात ओळख असून, उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेट काढून देण्यासाठी रुपये ५ हजार द्यावे लागतील, अशी मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्रचालक संतोष वाळके व त्यांच्या महा-ई-सेवा केंद्रात काम करणारी नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील काम करून देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून नंदा शिवरकर हिने तक्रारदार यांच्याकडून २ हजार ५०० रुपये पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याविरुद्ध दिघी पोलिस स्टेशन, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk Cocoon Production : आरक्षणासाठी बीड बंद! बाजार समितीही बंद असल्याने १० ते १२ टन रेशीम कोष शेतावरच अडकला

Jayakawadi Water Storage : जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर; प्रकल्प जवळपास तुडुंबच

Mango Management : अतिघन बागेत उत्तम बहरासाठीचे तंत्र

Paddy MSP : झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय; एमएसपी व्यतिरिक्त, धानावर प्रति क्विंटल १०० रुपये बोनस

Agriculture Sector Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात झपाट्याने घट, पाच लाख शेतकरी अत्यल्प भूधारक

SCROLL FOR NEXT