Farmer Workshop Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : लुपीन फाउंडेशनची सेंद्रिय शेती कार्यशाळा

National Farmer's Day : लुपिन फाउंडेशनच्या वतीने कुळे येथे ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ आयोजित करण्यात आला.

Team Agrowon

Pune News : लुपिन फाउंडेशनच्या वतीने कुळे येथे ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात कोळवण खोऱ्यातील दहा गावांतून १५० शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. लुपिन फाउंडेशनचे, पुणे व्यवस्थापक संदीप झणझणे यांनी शेतकरी दिवस आयोजित करण्याचा उद्देश व संकल्पना याबाबत विचार मांडले.

‘मातीचे आरोग्य व शाश्वत शेती’ या विषयावर मृदा तज्ज्ञ, डॉ. बी. एस. कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याविषयी त्यांनी माती परीक्षण करून घेण्याविषयी मार्गदर्शन करून त्याचे महत्त्व सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

सेंद्रिय शेतीचे महत्त्व व गरज या विषयावर मुळशी तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सेंद्रिय शेती व त्याचे मृदा आरोग्य व मानवी आरोग्यासाठी फायदे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी विभागाच्या योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक शेखर विरणक व मंडळ कृषी अधिकारी भाऊ जाधव, कुळे गावच्या सरपंच मंदा मराठे, उपसरपंच आकाश साठे, चिखलगावचे सरपंच किरण फाले,अशोक जोरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमचे आयोजन मुळशी तालुका समन्वयक प्रताप मोटे, रुपेश सावंत व बाळू बोऱ्हाडे यांनी केले. आभार प्रदर्शन लुपिनचे रूपेश सावंत यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT