Organic Farming : सेंद्रिय शेती करायचीय? मग या गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात

Team Agrowon

निविष्ठा

सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर वर्ज्य मानला जातो. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, संजीवके, विद्राव्य खते यांच्या ऐवजी पिकांच्या योग्य वाढीसाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते आणि जैविक घटकांचा वापर केला जातो. 

Organic Farming | Agrowon

मशागतीय पद्धती

शागतीय पद्धती उदा. पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धती, सापळा पिकांची लागवड इ. या व्यवस्थापनामध्ये समावेश केला जातो. 

Organic Farming | Agrowon

सेंद्रियचे प्रमाणपत्र

रासायनिक शेती पद्धतीचे रूपांतर पूर्णपणे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये करायचे झाल्यास साधारणत: ४ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. यामध्ये सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये उत्पादित मालासाठी सेंद्रियचे प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही. 

Organic Farming | Agrowon

वनशेती

सेंद्रिय शेतीखाली आणायच्या एकूण क्षेत्राच्या एक तृतीयांश क्षेत्रावर वनशेती करणे क्रमप्राप्त असते. त्यात सुबाभूळ, गिरिपुष्प, शेवरी, शेवगा, हादगा, आपटा, बोर, आंबा, कडुनिंब, साग, सीताफळ, बांबू अशा वृक्षांची लागवड करून जैवविविधता जपावी लागते.

Organic Farming | Agrowon

नगदी पिकांची लागवड

एक तृतीयांश क्षेत्रावर नगदी पिकांची लागवड करावी. राहिलेल्या एक तृतीयांश क्षेत्रावर अन्नधान्य पिकांची लागवड करावी.

Organic Farming | Agrowon

सेंद्रिय प्रमाणित उत्पादित माल

प्रमाणपत्राच्या आधारे आपल्या शेती उत्पादनांची विक्री सेंद्रिय प्रमाणित उत्पादित माल स्वरूपामध्ये देश विदेशामध्ये विक्री करता येते.

Organic Farming | Agrowon

सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक

प्रमाणीकरण करण्यासाठी भारत सरकारने काही विशिष्ट यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक असते.

Organic Farming | Agrowon
Fig Processing | Agrowon
आणखी पाहा...