Lumpy Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा ५२ जनावरांना प्रादुर्भाव

Lumpy Vaccination : ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

Team Agrowon

Satara News : ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सातारा, खटाव, फलटण, कोरेगाव व माण तालुक्यांतील ५२ जनावरे ‘लम्पी स्कीन’ या आजाराने बाधित आहेत. लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे जनावरांमध्ये या आजाराचा जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसह राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने सातारा जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविली आहे. लसीकरणात जी जनावरे चुकली आहेत, त्या ठिकाणी पुन्हा प्राधान्याने लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

जिल्ह्यातील सातारा तालुक्यात १४, खटाव ८, फलटण ५, कोरेगाव १८, माण ७ असे मिळून ५२ जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत. बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. आजाराची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडूनच जनावरांची तपासणी करून घ्यावी. आजारी आणि निरोगी जनावरांना एकत्र बांधू नये.

या आजाराचा प्रसार कीटकामार्फत होत असल्यामुळे कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठा आणि परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. निर्जंतुक द्रावणाने फवारणी करावी. आजारी आणि निरोगी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चारा खाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. याचबरोबर आजाराची लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

जनावरांना झालेल्या ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी जनावरे आजारी आहेत, त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. पशुपालकांनी जनावरांना आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती द्यावी.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: गहू खरेदीला विलंब, शेतकरी संघटनांकडून पंजाबमध्ये १७ एप्रिलला 'रेल्वे रोको' आंदोलन

APMC Trader Dispute: लासलगाव बाजार समितीत नव्या-जुन्या व्यापाऱ्यांत वाद

Summer Orange Care: कडक उन्हात संत्रा बागेची काळजी कशी घ्यावी?

Dharashiv Heatwave: धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा; नागरिक हैराण

Water Conservation: जलसंधारणासाठी निधी कमी पडू देणार नाही

SCROLL FOR NEXT