Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease Sangli : सांगली जिल्ह्यात ‘लम्‍पी स्किन’ने पुन्हा काढले डोके वर, पशुसंवर्धन विभाग सतर्क

Lumpy skin : गोचीड, गोमाशी अशा रक्त शोषक कीटकापासून याचा प्रसार होतो. म्हणून जनावरांच्या बरोबर गोठे, गोठ्याचा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

sandeep Shirguppe

Sangli Animal Husbandry Department : मागच्या काही महिन्यांपासून कमी झालेल्या लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात अनेक गायींना लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत. वाळवा तालुक्यातील खरातवाडी, पेठ या गावामध्ये गोवर्गातील ७ जनावरांना लम्पी स्किनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यात शंभर टक्के लम्पी स्किन आजाराचे प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तरी सुद्धा काही जाणवरांना लम्पी स्किनची लागण होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी, गोठ्याची स्वच्छता ठेवण्याचे आवाहन शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

वाळवा तालुक्यातील पशुपालकांनी जनावरांच्या लम्पी स्किन या त्वचेच्या आजाराबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. याला घाबरून न जाता जनावरांना उपचार करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंधक उपाय करणे हेच महत्त्वाचे ठरत आहे. लम्पी स्किन हा विषाणूजन्य आजार माशी चावल्याने होतो. ही माशी दिवसाकाठी ३०० किलोमीटर इतका प्रवास करू शकते. त्याबरोबर गोचीड, गोमाशी अशा रक्त शोषक कीटकापासून याचा प्रसार होतो. म्हणून जनावरांच्या बरोबर गोठे, गोठ्याचा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

मागील दोन महिन्यात सतत संततधार पाऊस असल्याने दलदलीचे वातावरण निर्माण झालेले डास, माशा यांची संख्या वाढली आहे त्यामुळे लम्पी स्किनने पुन्हा डोके वर काढले आहे. हजार गोवर्गातील यांना होतो. हा त्वचारोग असला तरी विषाणूजन्य आहे. त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होतो.

संपूर्ण तालुक्यामध्ये जनावरांना लम्पी स्किन आजार प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या लसीतून प्रतिबंध होण्यास काही कालावधी लागतो. त्यामुळे लसीकरण केलेल्या जनावरांना सुद्धा या रोगाची लागण होऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी आपला गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. राज्यातून जनावरांची खरेदी टाळावी यात्रा, बाजार या ठिकाणी जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. परिसरात औषधाची फवारणी करावी की ज्यामुळे लम्पी आजार थांबू शकेल.

वाळवा तालुका पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डॉ. सचिन वंजारी म्हणाले की, वाळवा तालुक्यात पेठ व खरातवाडी या दोन गावात लम्पी स्किन बाधित ७ जनावरे आढळून आली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील लम्पी स्किनचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. गोठ्यात स्वच्छता ठेवावी.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अजय थोरे म्हणाले की, लम्पी स्किन प्रतिबंधक लसीकरण केले तरीही काही ठिकाणी लम्पी स्किन बाधित जनावरे आढळून येत आहेत. जनावरांच्या शरीरात ६० टक्के लसीचा प्रभाव होतो. पशुपालकांनी जाणवरांना प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावेत.

जिल्ह्यातील एकूण पशुधन - ८ लाखांवर

गो वर्ग - ३, लाख २४ हजार ७५४.

म्हैस वर्ग - ४ लाख ९३ हजार ९९८.

लम्पी स्कीन बाधित --साधारण - ७००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT