Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Insurance : खरीप पीकविमा योजनेला कमी प्रतिसाद

Kharif Season : पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेला खानदेशात यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. परतावे न मिळणे, विमा कंपनीची मनमानी आदी कारणांनी या योजनेकडे यंदा अनेकांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेला खानदेशात यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. परतावे न मिळणे, विमा कंपनीची मनमानी आदी कारणांनी या योजनेकडे यंदा अनेकांनी पाठ फिरविल्याची स्थिती आहे.

उंबरठा उत्पादन व अन्य अनेक निकष या पीकविमा योजनेसंबंधी आहेत. एक रुपयात पीकविमा योजनेत सहभाग, असा उपक्रम शासन राबवीत आहे. परंतु या योजनेतून मागील वेळेस परतावे अनेकांना मिळाले नाहीत. दुष्काळी स्थिती होती. परंतु उंबरठा उत्पादनाचा निकष व अन्य निकषांमुळे कापूस, सोयाबीन व अन्य पिकांसंबंधी नुकसान होऊनही परतावे मिळाले नाहीत. शासन या योजनेचा गवगवा करते, परंतु भरपाई मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, यंदा अनेकांनी योजनेकडे पाठ फिरविली आहे.

नंदुरबारात मागील वर्षी ८८ हजारांवर शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. यंदा ८१ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात मागील वेळेस चार लाख शेतकरी योजनेत सहभागी झाले होते. यंदा आतापर्यंत सुमारे सव्वातीन लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे. धुळ्यात सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी खरिपात विविध पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. यंदा सव्वालाख शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत.

मागील वेळेस दुष्काळी स्थिती होती. कापूस, सोयाबीनची किडींमुळे हानी झाली होती. परंतु या योजनेत किडींमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत परतावे मिळत नाहीत. अतिवृष्टी व दुष्काळ यासंबंधी नुकसान भरपाई दिली जाते. त्यात उंबरठा उत्पादन कसे आहे, यावरही परतावे देण्यासंबंधी कार्यवाही केली जाते. उंबरठा उत्पादनाच्या निकषात विमाधारक परताव्यांसाठी पात्र ठरले नाहीत.

खानदेशात कापूस पिकासाठी सर्वाधिक विमा संरक्षण घेणारे शेतकरी आहेत. त्यापाठोपाठ सोयाबीन पिकासंबंधी विमा संरक्षण घेतले जाते. कापसाची खानदेशात सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. परंतु या सर्व क्षेत्रासाठी विमा संरक्षण यंदा घेतले जाणार नाही, अशी स्थिती आहे.

सर्व्हरची अडचण

पीकविमा योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु योजनेत सहभागी होताना सर्व्हर डाऊनसह अन्य तांत्रिक अडचणीदेखील येत आहेत. डिजिटल सात-बारा उतारा डाऊनलोड करता येत नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे काही शेतकरी या योजनेत मागील दोन दिवसांत सहभागी होऊ शकलेले नाहीत.

शेतकरी शेतीकामात व्यग्र

विमा योजनेत सहभागासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. बँका, सीएससी केंद्रांत गर्दी असते. यात सध्या सततच्या पावसाने शेतात तण वाढले आहे. अन्य कामेही रखडली आहेत. ती उरकून घेण्यास सध्या अनेकांनी प्राधान्य दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Prices: कर्नाटकात कांद्याचे भाव गडगडले, हमीभाव देण्याची मागणी

Rabi Season Preparation : पीक प्रात्यक्षिके ७३७ गावांमध्ये होणार

Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे रखडले

Agrowon Podcast: आल्याच्या किमतीत सुधारणा; वांग्याची आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, संत्र्याच्या किमतींवर दबाव, केळीच्या किमती वाढल्या

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र होणार

SCROLL FOR NEXT