
Satara News : पीकविमा उतरवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सोमवारअखेर (ता. १५) जिल्ह्यात तब्बल दोन लाख ८५ हजार ६५१ शेतकऱ्यांनी एक रूपया भरून पीकविमा घेतला आहे. त्याद्वारे एक लाख पाच हजार ९९४ हेक्टर शेतीवरील पिके संरक्षित झाली आहेत.
सध्या निसर्गाचा लहरीपणा वारंवार अनुभवास येत असल्यामुळे आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवून या प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणासाठी शेतकरी सरसावले आहेत. या योजनेत फक्त एक रुपयाद्वारे सहभागी होता येत आहे. पीकविमा योजनेबद्दल गैरसमज असल्याने यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा योजनेस तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, गतवर्षीपासून पीकविमा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील दोन लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ११५ कोटी रुपये विमा कंपनीने दिले. या भरपाईचा शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
या खरिपातही पंतप्रधान पीकविमा योजना जाहीर करण्यात आली होती. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या नऊ पिकांचा समावेश होता. मुदत ३१ जुलैपर्यंत वाढल्याने विमाधारकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पीकविमाधारक शेतकरी
जावळी-२,७४६, कऱ्हाड-७,६४९, खंडाळा- ३१,२२८, खटाव-८९, ६८६, कोरेगाव-२४,४९७, महाबळेश्वर- १,३६८, माण- ८०,३४९, पाटण-२,०३८, फलटण-७,०९८, सातारा-१७,७३३, वाई-२१,२५९.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.