Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेला थंड प्रतिसाद

Crop Insurance Scheme : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, काजू क्षेत्र सरंक्षित करण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप फळपीक विम्याचा परतावा न मिळाल्यामुळे या वर्षी या योजनेला जिल्ह्यातून थंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांनीच या योजनेत सहभाग दर्शविला असून आता फक्त सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा, काजू क्षेत्र सरंक्षित करण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. परंतु गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी आंबा, काजू फळपीक विमा घेतला होता त्यापैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना देय असूनही अद्याप परतावा मिळालेला नाही.

गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांनी १७ हजार ७३७ हेक्टर क्षेत्र विमा सरंक्षित केले होते. त्यामुळे ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटींचा परतावा मंजूर आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात १० नोव्हेंबरला विमा रक्कम जमा झाली. परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी अद्याप परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचा परिणाम यावर्षीच्या फळपीक विमा योजनेच्या प्रतिसादावर झाला आहे.

गेल्या २४ दिवसांत जिल्ह्यातील ११ हजार आंबा, काजू बागायतदारांनी पीक विम्याखाली क्षेत्र संरक्षित केले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत आंबा, काजू ही पिके विमा सरंक्षित करण्याची मुदत आहे. मात्र शेतकऱ्यांकडून यावर्षी विमा योजनेला थंड प्रतिसाद मिळत आहे.

यासंदर्भात जिल्हा कृषी विभागाकडून आंबा, काजू बागायतदारांना ३० नोव्हेंबरपूर्वी देय असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात परतावा जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी या वर्षीच्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT