Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेस कमी प्रतिसाद

Crop Insurance Scheme : फळ पीकविमा योजनेत सहभागासंबंधी शासन किंवा विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरवात झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : फळ पीकविमा योजनेत सहभागासंबंधी शासन किंवा विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. परंतु योजनेला कमी प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातून सुमारे तीन हजार प्रस्ताव सादर झाले आहेत.

बँका, कॉमन सर्व्हीस सेंटर (सीएससी), विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून शेतकऱ्यांना या योजनेतून केळी व इतर पिकांसाठी विमा संरक्षण घेण्यासंबंधी अर्ज सादर करायचे आहेत.

१ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. परंतु सुरवातीचे तीन दिवस जिल्ह्यातून एक हजार अर्जदेखील या योजनेत सहभागासंबंधी दाखल झाले नव्हते. तसेच मागील दोन दिवसात अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हे अर्ज रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा या तालुक्यांतून सादर झाले आहेत. सर्वाधिक अर्ज दरवर्षी रावेरातून सादर केले जातात. रावेरात केळीची लागवड २२ ते २३ हजार हेक्टरवर केली जाते. यापाठोपाठ यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव तालुक्यात केळीची लागवड केली जाते. यामुळे या भागातूनच अर्जांची संख्या अधिक असते.

कर्जदार शेतकरी कर्ज घेतलेल्या बँकेत आपला केळी व इतर फळ पिकांसाठी विमा संरक्षणाबाबतचा अर्ज सादर करीत आहेत. बँकांमधूनच अधिकचे अर्ज सादर झाले आहेत. सीएससी व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून फारसे अर्ज सादर झालेले नाहीत. बिगर कर्जदार शेतकरी सीएससीमधून अर्ज सादर करू शकतात. ३१ ऑक्टोबरपर्यंत केळी उत्पादक शेतकरी या योजनेतून केळी पिकाला विमा संरक्षणासाठी अर्ज सादर करू शकतील.

मागील भरपाईच अडकली

जिल्ह्यात मागील वर्षी (२०२२-२३) फळ पीकविमा योजनेत सुमारे ७७ हजार केळी उत्पादक सहभागी झाले होते. परंतु यंदा एवढी सख्या राहणार नाही. कारण या योजनेतून शेतकऱ्यांना मागील वर्षाचे परतावे अद्यापही मिळालेले नाहीत. केळी पीकविमाधारकांना हे परतावे मागील महिन्याच मिळणे अपेक्षित होते.

परंतु शासनाकडून चौकशी, पीक पडताळणी, निधीचा अभाव, ई पीक पाहणी अमान्य करणे असा गोंधळ सुरू आहे. यामुळे परतावे प्राप्त झालेले नाही. शेतकऱ्यांनी मागील वेळेस १० हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी विमा हप्ता भरला होता. हा निधी वाया जातो की, काय, अशी स्थिती आहे. परिणामी यंदा योजनेत सहभाग वाढलेला नाही. यातच सध्या पितृपक्ष सुरू असल्याने अनेक जण खरेदी, शुभ कामाला सुरवात करीत नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT